आशाताई बच्छाव
जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची उबाठा गटाकडून मागणी; आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह, जाणून घ्या अलिबाग-मुरुड मतदार संघाचा आढावा
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरु केलीय. सर्वचर्चित आणि राजकीय सामाजिक दृष्या महत्वपूर्ण मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा आणि जिल्हा मुख्यालयीन असलेला अलिबाग-मुरुड मतदार संघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद सुरेंद्र म्हात्रे उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने अलिबाग जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली चौल येथील कार्यालयात आयोजित सवांद बैठकीत करण्यात आली आहे.
अलिबाग विधान सभा मतदार संघात २०१९ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे महेंद्र दळवी यांनी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांचा एकतीस हजार हुन अधिक मतांनी पराभव करीत निवडून आले होते. मात्र मुळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. २०१९ साली शिवसेनेचा आमदार यांनी शेकापचे वर्चस्व उलथून शिवसेनेचा भगवा या मतदार संघात फडकिवला होता. त्यामुळे हा मतदार संघ महाआघाडीकडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळावा आणि या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची ताकद जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यात असल्याने त्यांना अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी यासाठी विधान सभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख मागणी आहे.
या संवाद सभेर उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, सल्लागार सतिश पाटील, मुरुड शहर प्रमुख आंदेश दांडेकर, मुरुड नगर परिषद माजी सभापती प्रमोद भायदे, मापगांव विभाग प्रमुख सुबोध राउत, कैलास गजने, विकास पिंपळे, अजय सोंडेकर, विरेंद्र जावसेन, रामराज विभाग प्रमुख गिरीष शेळके, गटप्रमुख महेश ठोंबरे, उपतालुका प्रमुख प्रकाश गायकर, चौल विभाग प्रमुख मारूती भगत, विभाग प्रमुख शशिकांत गांवड, उपतालुका प्रमुख सुरेश पाटील, चितांमण राउत, शशिकांत ठाकूर, उपविभाग प्रमुख शैलेश घरत, शाखा प्रमुख विशाल ठाकूर, रविंद्र गजने, सुधीर पाटील, राकेश पाटील, मिळकतखार शाखा प्रमुख रोहिदास जांभळे, युवासेना अधिकारी स्वप्नील कडवे, माजी उपविभाग प्रमुख सुरेश कृष्णा घरत, विभाग प्रमुख योगेद्र अमरनाथ जुईकर, मुरूड युवा सेना तालुका अधिकारी तथा वळके ग्राम पंचायत माजी सरपंच किशोर काजारे, मिंलिद कोपरकर, खालिद वनकर, समीर नाईक, नरेश कुबळ, जयवंत भोईर, अजीत गुरव आदी सहित कार्यकर्ते उपस्थित होते
रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड रोहा विधान सभा मतदार विधान सभा मतदार संघाची २००८ साली पुनर्रचना झाली.
या विधानसभा मतदार संघातील अलिबाग हा तालुका उरण मतदार संघात जोडला होता तर मुरुड हा तालुका श्रीवर्धन मतदार संघात जोडला होता. मात्र २००८ नंतर नवीन पुनर्रचना नुसार अलिबाग मुरुड आणि रोहा तालुक्यातील काही भाग हा मिळून अलिबाग रोहा मुरुड विधान सभा मतदार संघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या विधानसभा मतदार संघात तीन निवडणुका पार पडल्या या मध्ये २००९ साली माजी राज्यमंत्री तथा शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा तेवीस हजार हुन अधिक मतांनी पराभव केला होता. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे छोटे बंधू सुभाष पाटील (पंडितशेठ) यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचा सोळा हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी माजी आमदार पंडित पाटील यांचा एकतीस हजार हुन अधिक मतांनी पराभव केला होता.
संघात असून ही जागा आम्हालाच मिळावी असा आग्रह सुध्दा ठाकुर यांनी धरला आहे. तर शेकापने यंदा हा मतदारसंघ आम्हाला देऊन त्यांनी अन्य जागेवर उमेदवारी लढवण्याची भाषा देखील ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आता अलिबाग मुरुड मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडतीलचं आणि ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू असा विश्वास देखील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलाय. प्रवीण ठाकुर हे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे मोठे चिरंजीव आहेत. शिवाय काँग्रेसचे ते महाराष्ट्र प्रदेश चिटणीससुध्दा आहेत. त्यांना प्रशासनाचा आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्यानं काँग्रेसकडून आता त्यांच्या नावाची चर्चा आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या स्नुषा महीला जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या सुद्धा अलिबाग विधान सभा मतदार संघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांच्या नावाला माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे धाकटे बंधू यांनी याला विरोध करीत मत मांडले की जो कोणी उमेदवार असेल त्याला यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा अनुभव हवा असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील (पप्पू शेठ) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. पप्पू शेठ यांनी आजपर्यंत अनेक निवडणुकांना सामोरे गेले असल्याने त्यांना निवडणुकीचा अनुभव असल्याने ते योग्य आहे. शेकाप ने चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिल्यास पेझारी येथील शेकाप वेगळी भूमिका घेईल अशी चर्चा जोरात रंग धरत आहे.
अलिबाग विधान सभा मतदार संघाचे नेतृत्व महायुतीचे आमदार महेंद्र दळवी हे करीत असून ते शिवसेना शिंदे गटाचे आहे. विद्यमान आमदार म्हणून त्यांना उमेदवारी मिळावी अशी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे.
मात्र सद्यस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांच्या शिंदे गट आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर (छोटम शेठ) मधून विस्तव देखील जात नाही. महा युतीमधील भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर (छोटम शेठ) देखील आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीकडून हा मतदार संघ कोणाच्या वाटेला येतो आणि कोण अपक्ष निवडणुक लढविणार हे येणारा काळच ठरविणार आहे.
पुर्वी शेकापचा बालेकिल्ला असणारा हा मतदार संघ (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024) आता शिंदेच्या शिवसेनेकडे जरी असला तरी पुन्हा शेतकरी कामगार पक्षाने हा गड आपल्याकडे मिळविण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. एकूणच या मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शेकापमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसतायेत. काँग्रेसचे प्रवीण ठाकूर अलिबाग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्या अनुषंगाने त्यांनी या मतदार संघात मोर्चे बांधणी करून रणनीती आखण्यास जोरदार सुरवात केलीय. त्यामुळे यामतदारसंघात अतिशय चूरसपूर्ण लढत होईल असेच चित्र दिसून येतंय.
२०१९मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. २०१९ मध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाच्या सुभाष पाटील यांचा 32924 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. मात्र या निवडणुकीत प्रथमच काँगेस पक्षाच्या उमेदवार यांची अमानत रक्कम जी जप्त झाली होती.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक २००९ मध्ये उमेदवार निहाय मते
# उमेदवाराचे नाव पक्ष एकूण मते टक्केवारी शेअर
१ मीनाक्षी प्रभाकर पाटील/भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष/९३१७३/५३.६१%
२. ठाकुर मधुकर शंकर / काँग्रेस /६९०२५/३७%
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये उमेदवार निहाय मते
# उमेदवाराचे नाव/पक्ष / एकूण मते / टक्केवारी
१. सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील / भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष /७६९५९/३८.०२%
२. दळवी महेंद्र हरि शिवसेना / ६०८६५/३०.०७%
३. ठाकुर मधुकर शंकर (पप्पा) / काँग्रेस /४५८५३/२२.६५%
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक 2019 मध्ये उमेदवार निहाय मते
# उमेदवाराचे नाव / पक्ष / एकूण मते / टक्केवारी
१ दळवी महेंद्र हरि / शिवसेना / १११९४६ / ५२.११%
२ सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील / भारतीय शेतकरी आणि
कामगार पक्ष / ७९०२२/३६.७८%
३ राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर / अपक्ष / ११८९१/ ५.५४%