Home वाशिम वाशिम येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त पोषणम उत्सव साजरा उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.संजय...

वाशिम येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त पोषणम उत्सव साजरा उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.संजय गणवीर यांचे मार्गदर्शन

17
0

आशाताई बच्छाव

1000801717.jpg

वाशिम येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त पोषणम उत्सव साजरा
उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.संजय गणवीर यांचे मार्गदर्शन
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने स्वयं शिक्षण प्रयोग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० सप्टेंबर रोजी पंचायत समिती येथे पोषणम उत्सव साजरा करण्यात आला.
या राष्ट्रीय पोषण महिन्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन पोषक व पौष्टिक आहार खाण्याच्या सवयींबद्दल जागरुकता वाढवणे, असुरक्षित गटांमध्ये पोषण सुरक्षेला प्रोत्साहन देणे, विविध शैक्षणिक कार्यक्रम, उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे समुदायांना गुंतवणे, पोषण परिणाम सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे. मुले आणि मातांमधील कुपोषण कमी करणे आणि अशक्तपणा कमी करणे.या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून, पोशन माह एक निरोगी, अधिक पोषण-सजग समाज निर्माण करण्याचे उद्दिष्टास अनुसरून वाशिम जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या पोषणम उत्सव कार्यक्रमात या भागात मिळणार्‍या कडधान्ये आणि विविध प्रकारच्या रानभाज्या, फळे आणि इतर पालेभाज्यांच्या पौष्टिक पाककृती तयार करून त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले, ज्यामध्ये वाशिम गटातील अंगणवाडी सेविका आणि स्थानिक महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्या तयार करून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांचे महत्त्व ही समजावून सांगितले. आहारातील विविधता आणि सकारात्मक सवयींबद्दल मुख्य संदेश देण्यासाठी डिझाइन केलेले संवादात्मक समज देण्यासाठी पोषण सेल्फी स्टँड, टिपी टॅप, पोषण रांगोळी, साप आणि शिडी खेळाची सानुकूलित आवृत्ती प्रदर्शित केली होती. पोषणम प्रकल्पाच्या खएउ मध्ये प्रदर्शित केले गेले. त्याचबरोबर पोषणमाह निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रम आणि सेनू पोषणम प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. तसेच प. पू पुरुषोत्तम बाबा कला संच शाहीर के.के डाखोरे व त्यांच्या चमूने पोषण, आरोग्य व परसबाग यावर आधारित जनजागृतीपर गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या रोजच्या आहारात किमान ५-६ आहार समूहाचा वापर, स्तनपान, वैयक्तिक स्वछता, परसबाग लागवड, सामाजिक व्यवहार, सकारात्मक दृष्टिकोन याबरोबरच लहान बालके व १५ ते ४९ वयोगटातील किशोरी, गर्भवती स्तनदा प्रजननक्षम महिलांच्या आरोग्य व आहारातील विविधतेसोबत पोषण सुरक्षा व घर-घर पोषणबाग, स्वच्छता, शौचालयाचा उपयोग आणि शुध्द पेयजलसंबंधी वागणूकीत सकारात्मक वाढीसाठी, गीतातून प्रबोधन केले. तसेच प्रमुख पाहुणे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (मबाक) संजय गणवीर यांचेही यावेळी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात अतिशय सुंदर पोषण रांगोळी काढणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. पोषणम टीमने केलेल्या कार्याबद्दल त्यांचेही कौतुक व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, वाशिम गटविकास अधिकारी रवी सोनुने, गटविकास अधिकारी गजानन खुळे, प्रा. डॉ. प्रसेनजीत चिखलीकर व स्वयम् शिक्षण प्रयोगचे प्रकल्प समन्वयक उत्तम पाटोळे तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प वाशिमच्या सर्व पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविका, पोषण मित्र, महिला-पुरुष मोठया प्रमाणावर सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here