Home भंडारा भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येणारे नाग नदीचे दूषित पाणी दुसरीकडे वळवा- खासदार...

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येणारे नाग नदीचे दूषित पाणी दुसरीकडे वळवा- खासदार डॉ .प्रशांत पडोळे

16
0

आशाताई बच्छाव

1000801702.jpg

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येणारे नाग नदीचे दूषित पाणी दुसरीकडे वळवा- खासदार डॉ .प्रशांत पडोळे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) नागपूर जिल्ह्यातील नाग नदीचे दूषित पाणी हे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिळत असल्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी दूषित होते. त्यामुळे अनेक समस्यांना भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना सामना करावा लागत आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,नागपूर जिल्ह्यातून जे नाग नदीचे दूषित पाणी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत येऊन मिळते त्या पाण्यामध्ये कारखान्याचा कचरा ,शहरातील घाण, मूत्र, प्लास्टिक मिश्रित असतो. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कारण वैनगंगा नदीतील पाणी हे नळ योजनेद्वारे नागरिकांना दिल्या जाते. त्यामुळे पोटाचे आजार ,त्वचेचे आजार, कावीळ यासारखे रोग होतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. गंभीर आजार त्यामुळे होतात. त्याचप्रमाणे हे पाणी शेती करता वापरल्या जाते. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतो यामुळे शेतीची गुणवत्ता कमी होते.
नागपूर जिल्ह्यातील नाग नदीचे पाणी आहे हे नागपूर जिल्ह्यातीलच वीज प्रकल्पाकरिता किंवा कारखान्याकरिता त्या पाण्याचा वापर करण्यात यावा व नागरिकांना या दूषित पाण्यापासून मुक्त करावे अशी मागणी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी महामाईम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णण यांना एका लेखी दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे .यावेळी माजी खासदार सुनील मेंढे ,माजी खासदार मधुकर कुकडे ,माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष जिभकाटे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleएकत्रीकरणासाठी उद्या 3 ऑक्टोबरला नागपूरच्या संविधान चौकात महाधरणा आंदोलनाचे आयोजन
Next articleमहाराष्ट्राचे राज्यपाल सी .पी .राधाकृष्णन यांना गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here