Home गडचिरोली लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊंचे सरकार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊंचे सरकार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

22
0

आशाताई बच्छाव

1000783846.jpg

लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊंचे सरकार

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

कुरुड येथील मेळाव्याला लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद

महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयावर डोळा योजना बंद करण्यासाठी चालवली खटापट

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा केला सत्कार

कुरुड/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील   महायुतीच्या सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपयांची भेट दिली असून हे महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुरुड येथील लाडक्या बहिणींचा मेळाव्याला मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, युवा नेते मधुकरराव भांडेकर , सरपंच विनोद मडावी अनिता सातपुते मेघा सुराजगडे. मंजुषा मोहुरले दिपिल चालक साईनाथ बुरांडे, शुभांगी बावनकर मंजुषा सातपुते अहिल्या महूर्ले प्रतिभा वैरागडे यशोधरा सेट्टीवार प्रतिमा सातपुते रंनिता रॉय ( सचिव) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की राज्यातील महाविकास आघाडीचे नेते  लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या  विरोधात आहेत.  या बहिणींना ही रक्कम मिळू नये ही योजना बंद कशी होईल  यासाठी काँग्रेस , शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा शिवसेना प्रयत्न करीत आहे . त्यामुळे लाडक्या बहिणीने येणाऱ्या काळात महायुतीच्या देवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी  यावेळी केले.
मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणीनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार केला

Previous articleमहिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleजाफराबाद तालुक्यात तीन दिवसा पासून पावसाची संततधार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here