Home गडचिरोली महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय आमदार डॉक्टर देवरावजी होळी

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय आमदार डॉक्टर देवरावजी होळी

31
0

आशाताई बच्छाव

1000783835.jpg

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुतीच्या सरकारचे अनेक क्रांतिकारक निर्णय

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

कुनघाडा येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा

आवाहनाला प्रतिसाद देऊन मेळाव्याला आलेल्या लाडक्या बहिणींचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले आभार

कुनघाडा/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत, लाडक्या बहिणींना १५०० रुपये प्रतिमाह मानधन, मुलींना मोफत शिक्षण असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुनघाडा येथील लाडक्या बहिणींच्या भव्य मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाचे ओबीसी नेते मा. बाबुरावजी कोहळे. जयश्री धोडरे अध्यक्ष प्रभाग संघ कमलताई दुधबले सचिव प्रभाग संघ अर्चनाताई वाघाडे बँकसखी शकुंतलाताई तुंकलवार दर्शना नैताम प्रभाग संघ वंदना ठाकूर प्रभारसंघ भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

या मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्यावर असणारे स्नेह व्यक्त केले . मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आमदार महोदयांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले

Previous articleविविध मागण्यांसाठी ढिवर समाजाचा ४ ऑक्टोंबरला धडक महामोर्चा हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : समाज संघटनेचे आवाहन
Next articleलाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊंचे सरकार आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here