Home विदर्भ हिंगोली जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे आ. संतोष बांगर यांनी पैसे वाटत असल्याची...

हिंगोली जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे आ. संतोष बांगर यांनी पैसे वाटत असल्याची तक्रार

48
0

आशाताई बच्छाव

1000783662.jpg

हिंगोली जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे आ. संतोष बांगर यांनी पैसे वाटत असल्याची तक्रार    हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली शिवसेना उबाठा गटाची
गेल्या अनेक दिवसापासून आ. संतोष बांगर हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी चर्चेत असणारे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी पैसे वाटत असल्याची शिवसेना उबाठा गटाची तक्रार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी आमदार संतोष बांगर हे मतदार संघातील महिलांना पैसे वाटत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.
जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, बालासाहेब मगर, डॉ. रमेश मस्के, अजित मगर, आनंदराव जगताप, उद्धवराव गायकवाड, सखाराम उबाळे व अन्य काही अनेक पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना याबाबत एक लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात तक्रार करण्यात आली आहे की, आ.संतोष बांगर हे कळमनुरी मतदार संघात एका कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर महिलांना पैसे वाटत आहेत.हे वाटप लाखोंच्या रकमेचे असून जिल्ह्यात चालविल्या जाणार्‍या अवैध धंद्यातून हा पैसा वाटप केला जात आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पैसे देणे चालू आहे त्यामुळे अवैध पैशाचे वाटप बंद करावे व सदरील बाबीची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.
पायाखालची वाळू घसरत आहे- आ. बांगर
कळमनुरी विधानसभा मतदार संघात झालेली विकास कामे, मुख्यमंत्र्यांनी दिलेली लाडकी बहीण योजना व शिवसेनेला मतदार संघात पोषक होत असलेले वातावरण बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे आ. संतोष बांगर यांनी या तक्रारीवरून आपला पारा चांगलाच वर चढवल्याची पाहायला मिळत आहे.

 

Previous articleफार्मसी कॉलेज ने राबविले स्वच्छता अभियान
Next articleहिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे पाटीवर रस्ता राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात आले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here