आशाताई बच्छाव
एसटी बस अस्वच्छ: आगार प्रमुखांना किती झाला दंड? अनेक बसेस मध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा पुरविणाऱ्या एसटी बस रस्त्यात नादुरुस्त होतो. गडक्या बस, काचा खिडकीच्या तुटलेल्या, प्रवाशांना बसणाऱ्या सीटा, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन नाही. परंतु बस मध्ये अस्वच्छतेमुळे आता प्रवाशासोबतच टेस्टी कर्मचाऱ्यासोबत आरोग्याचा प्रश्न यरनिवर आला आहे. शासनाने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू केले होते. या अंतर्गत सर्व आगर प्रमुखांना एसटी बस आणि बस स्थानके स्वच्छ ठेवण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. एसटी बस वाक्य आढळल्यास आगर प्रमुखांना ५०० रुपये दंडाची घोषणा केली होती. मात्र हे अभियान आटोपल्यानंतर परिस्थिती द्यायचे ते झाल्याचे चित्र आता हल्ली सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसमध्ये केरकचरा, सीट लागत गुटखा, मावा खाऊन चुकलेले डाग दिसून येतात. चालकाची कॅबीन, डॅशबोर्ड, सीट खाली कचऱ्याचे साम्राज्य असते. कित्येक बसच्या सीटा फाटलेल्या, तुटलेल्या अवस्थेत असतात
खिडक्या तर अक्षरशा खुळखुळा आलेल्या असतात. स्थानकांची काही वेगळीअवस्था नाही. विशेष म्हणजे हींदुसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानानंतर मात्र अनेक बसेस मध्ये अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे. या अस्वच्छ बस स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आगर प्रमुखांवर असली तरी या आदेशाचे प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या राज्य परिवहन महामंडळा त बस स्थानकात दिसून येत आहे
त्यामुळे स्वच्छ बस न ठेवणाऱ्या आगर प्रमुखांना दंड करणार तरी कोणी, हा खरा प्रश्न आहे. आगर व्यवस्थापकावर गाड्यांच्या स्वच्छ तेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाईची तर तुद करण्यात आलेली आहे.ततपुर्वी वस्ती तपासणी केली जाते. त्यामुळे आगारप्रमुखा सजग आहे. एसटी महामंडळाकडून सर्व विभागांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आले आहे. हा नियम कागद्यावरच कारवाई नाही म्हणजे तपासणी पथक तपासणी करीत नाही काय, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला आहे. बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रित केल्याने बसेसच्या स्वच्छता प्राधान्य केले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच स्वच्छ असतात. मात्र क्वचित प्रसंगी एखाद्या बसमध्ये अस्वच्छता असल्याचे दिसून येते. आग्रा बस गेल्यावर स्वच्छ करण्यात येते”अमरावती जिल्हा एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रण निलेश बेलसरे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले. महिलांना दरमहिना१,५००/-असा आर्थिक लाभDBT द्वारे देण्यात येणार आहे एसटी महामंडळाने परिपत्रक काढून पाठवून दिले. त्यानुसार बैठका, सूचना देऊनही बसेस स्वच्छतेबाबत काही ठिकाणी स्थानिक प्रवाशांकडून कार्यवाही केली जात नाही. यामुळे दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.