Home अमरावती आदिवासी युवक क्रांती दलाची जिल्हा कचेरीवर निदर्शने: धनगर समाजाला आरक्षण वरून आक्रमक,...

आदिवासी युवक क्रांती दलाची जिल्हा कचेरीवर निदर्शने: धनगर समाजाला आरक्षण वरून आक्रमक, राज्यभरात निषेध.

33
0

आशाताई बच्छाव

1000778679.jpg

आदिवासी युवक क्रांती दलाची जिल्हा कचेरीवर निदर्शने: धनगर समाजाला आरक्षण वरून आक्रमक, राज्यभरात निषेध.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
प्रतिनिधी
अमरावती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचा आदिवासी बांधवाकडून राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो आदिवासी आदिवासी बांधव आदिवासी युवा क्रांती दलाच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर धडक दिली
यावेळी शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हालचाल करत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा आदिवासी युवा क्रांती दल संघटनेने जाहीर निषेध व्यक्त केला आहे
मुळात धनगर व धनगड हे दोन्ही शब्द अनुसूचीत जमातीच्या सुचित नाहीत. इंग्रजी शब्दाचे भाषांतर धनगड असे केले जात आहे
ओराॅन, धांगड,या जमातीशी धनगर जातीचा तीळ मात्र ही संबंध नाही. धनगर ही जात आहे; जमात नाही. तसेच संदर्भात असताना देखील चुकीच्या पद्धतीने धनगरांना अनुसूचित जमाती आरक्षण देण्याचे मागणी होत असताना या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिल्याने याच आदिवासी युवक क्रांती दलाच्या वतीने निषेध व्यक्त करा जिल्हा कचेरीवर निदर्शने करण्यात आली. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्णय हा आदिवासीच्या हक्कावर अतिक्रम असून तो निर्णय मागे घ्यावा, आदिवासी समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वेदनातून देण्यात आला. शिष्टमंडळात आदिवासी युवा क्रांती दलाचे अध्यक्ष रामेश्वर युनाते, पंकज व्हेरायटे, प्रशांत मडावी, वंदना कंगाले, विनोद मरस कोल्हे, रामेश्वर उईके, मोना आत्रम, सीमा मरकाम आदींचा सहभाग होता.

Previous articleदेवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मेळावा कुरुड व कुनघाडा येथे आज २५ सप्टेंबरला
Next articleएसटी बस अस्वच्छ: आगार प्रमुखांना किती झाला दंड? अनेक बसेस मध्ये पान, गुटखाच्या पिचकाऱ्या, प्रवाशांना मनस्ताप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here