Home बुलढाणा वीरमरण ! ‘कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन...

वीरमरण ! ‘कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों!’ -आतंकवाद्यांशी लढताना अखेर ‘दीपक’ विझलाय!

54
0

आशाताई बच्छाव

1000777878.jpg

वीरमरण ! ‘कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों!’ -आतंकवाद्यांशी लढताना अखेर ‘दीपक’ विझलाय!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणl तालुक्यातील पळसखेड गावातील वीर पुरुष देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना आतंकवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील सैन्य दलात कार्यरत असलेल्या दीपक बनसोडे यांनी वीरमरण पत्करले ! शत्रूशी शेवटपर्यंत लढणारा हा लढवय्या अखेर शहीद झाल्याने पळसखेड नागो सह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील भूमिपुत्र दीपक बनसोडे गत 5 वर्षापासून सैन्य दलाल कार्यरत आहेत. शहीद जवान दीपक बनसोडे यांनी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्युत्तर देत असताना वीरमरण आले.
22 सप्टेंबर 2024 ला जम्मू-काश्मीर येथे हेडकॉटर सेवन सेक्टर आर आर या ठिकाणी ते शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई येथे विमानाने त्यांचा मृतदेह आणण्यात येईल. अॅम्बुलन्स द्वारे त्यांच्या राहत्या घरी पळसखेड नागो येथे मृतदेह आल्यानंतर 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात सह गावात शोकाकूल वातावरण पसरलेले आहे.
युवा मराठा परिवाराकडून भारत मातेच्या वीर पुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली!

Previous articleवारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज निवड
Next articleआज पासून आरटीओ ठोकणार बेमुदत संपाचा शड्डू ! – अन्यायकारक प्रशासकीय तरतुदींमुळे घेतली बेमुदत संपाची भूमिका !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here