Home नाशिक चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, ग्रामसभा,सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती...

चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, ग्रामसभा,सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार- डि.के.गोर्डे-पाटील संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा

140
0

आशाताई बच्छाव

1000769314.jpg

 

ग्राम सुरक्षा यंत्रणा

चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, ग्रामसभा,सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार- डि.के.गोर्डे-पाटील संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा

सर्व ग्रामपंचायतीनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा.
आपत्कालीन व्यवस्थेसह महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा महत्वाची आहे
-शिशीरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक

तळवाडे, (निंबा जाधव विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क )

वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन तालुका -मालेगाव जिल्हा नाशिक कडून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज वार गुरुवार दिनांक 19/09/2024 रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600/9822112281 प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.विशाल सोनवणे तहसीलदार मालेगाव ,राहुल लामखडे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,शिशीरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन,दिपक मोहिते सरपंच सावतावाडी , गोपनीय अंमलदार रंणजित साळुंखे ,यांच्यासह वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,तहसील ऑफिस सर्व अधिकारी-कर्मचारी,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,तलाठी कोतवाल,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य सेविका,आरोग्य अधिकारी-कर्मचारी,व्यापारी,पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री.डी.के.गोर्डे-पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन मा. शिशीरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन यांनी केले.

ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब,प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्च ग्रामनिधी,15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून, लोकसहभाग इतर निधी तरतूद करता येणार.

गेल्या 14 वर्षांत पुणे,सोलापूर, अहमदनगर,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील 7000 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.ग्रामस्थ आपले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

 

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

 

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

Previous articleगरीब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदापेक्षा मोठा आनंद नाही – आ.कैलास गोरंटयाल
Next articleश्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आश्रमशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here