Home बुलढाणा खडकपूर्णा प्रकल्पातून रेती वाहतूक सुरुच एक बोट नष्ट पण ही फक्त कारवाई...

खडकपूर्णा प्रकल्पातून रेती वाहतूक सुरुच एक बोट नष्ट पण ही फक्त कारवाई नावालाच का? अवैध रेती वाहतुकीची धुमाकूळ सुरूच,शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी माहिती दिली एका व्हिडिओद्वारे प्रसार माध्यमांना

12
0

आशाताई बच्छाव

1000765717.jpg

खडकपूर्णा प्रकल्पातून रेती वाहतूक सुरुच एक बोट नष्ट पण ही फक्त कारवाई नावालाच का? अवैध रेती वाहतुकीची धुमाकूळ सुरूच,शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी माहिती दिली एका व्हिडिओद्वारे प्रसार माध्यमांना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील रेतीमाफीयी आणि बोटी धारक यांनी जो धुमाकूळ घातला आहे त्यावर महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी जी एक बोट उडवण्याचा प्रताप केला आहे तो काही शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांना पटलेला नाही त्यांनी एका व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की अनेक बोटी चालू असताना फक्त एकच बोट उडवून शाब्बासकीची थाप आपल्या पाठीवर घेणे हे महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांना कितपत योग्य वाटते खडक पूर्ण प्रकल्पमध्ये कितीतरी बोटी चालू आहे आणि अजून सुद्धा सुरू आहेत परंतु त्यातील एका बोटीवर थातूरमातूर कारवाई करून बोट उडवायचे आणि दिसत असलेल्या इतर बोटी ह्या आपल्या डोळ्यासमोरून जाऊ द्यायचे ही कोणती कारवाई कारवाई करायची असेल तर सरसगट करा कोणाला टार्गेट करायचं म्हणून कारवाई करू नका अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांचा फिरत आहे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन हे काय ठराविकच लोकांवर कारवाई करतात की काय असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांना वाटत आहे दोन दिवसापूर्वी खडक पूर्णा प्रकल्पातील तीन बोटी महसूल व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने तीन बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या होत्या. तेच सातत्य राखत सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 सप्टेंबर 2024 रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील पोलीस व महसूल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे अनुषंगाने मौजे दगडवाडी, मेहुनाराजा, बायगाव, चिंचखेड व सुलतानपूर या भागात शोध मोहीम राबविण्यात आली. त्या ठिकाणी त्यांना मौजे मेहुणा राजा येथील खडकपूर्णा धरणा जवळ अवैध रेती उपसा करणारी एक बोट बाबत माहिती मिळताच, त्या बोटीवर कारवाई करण्यात आली. त्या फायबर बोट जिलेटिन च्या साह्याने नष्ट करण्यात आली. सदर महसूल विभागाने पोलीस प्रशासन या मध्ये जे कोणी फितूर अधिकारी असेल त्यांना या कारवाईपासून दूर ठेवा कारण या फितुरी मुळेच एवढा प्रताप घडला आहे तरी सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक खडसे यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे की साहेब कारवाई करायची तर ही थातूरमातुर न करता सरसकट करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here