Home जळगाव आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून चाळीसगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या २९ कोटी ६८...

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून चाळीसगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या २९ कोटी ६८ लक्ष रुपयांच्या मुख्य इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता. ————————————————–

11
0

आशाताई बच्छाव

1000765715.jpg

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून
चाळीसगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या २९ कोटी ६८ लक्ष रुपयांच्या मुख्य इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता.
————————————————–
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या आरोग्य क्षेत्रातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीनंतर आता या रुग्णालयाच्या 29 कोटी 68 लक्ष रुपये खर्चाच्या मुख्य इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने दिनांक 19 सप्टेंबरच्या शासन निर्णयाने मान्यता दिली आहे.
चाळीसगाव येथे विशेष बाब म्हणून ३९ खाटांवरून थेट १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आमदार मंगेश चव्हाण यांनी मंजुर करून घेतले व तात्काळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूच्या जागेत प्रशस्त जागा त्यांनी आरक्षित केली असल्याने आता थेट बांधकामाला देखील मंजुरी मिळवली असल्याने लवकरच सुसज्ज अश्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांना गंभीर आजारावरील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक येथे जावे लागत होते त्यामुळे रुग्णांची गैरसोय आता थांबणार आहे .

चाळीसगाव तालुक्यातील विकास कामामध्ये उपजिल्हा रुग्णालय होणे ही अत्यंत महत्त्वाची व ऐतिहासिक घटना आहे, सदर रुग्णालयाच्या मान्यतेसाठी व इमारत बांधकाम निधी मंजुर केला त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत व मा. ना. गिरीश भाऊ महाजन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो” – आमदार मंगेश चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here