Home जालना सतीश घाटगेंकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातली घोषणा !

सतीश घाटगेंकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातली घोषणा !

13
0

आशाताई बच्छाव

1000760893.jpg

सतीश घाटगेंकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातली घोषणा !
गाळप झालेल्या उसाला यंदाही  देणार उच्चांकी भाव
घनसावंगी/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ:  ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकासाठी अभिनव योजना आणि उपक्रम राबवून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या  घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2023 -24 च्या अंतिम दराबाबत मोठी घोषणा केली असून समृद्धी साखर कारखाना उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवणार असून शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव  समृद्धी साखर कारखान्याचाच असेल,अशी माहिती  कारखान्याचे  चेअरमन सतीश घाटगे यांनी  दिली आहे. त्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती फाटा ते भादली शेतस्त्याचे काम सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून रविवारी सुरु केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून समृद्धी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला  उच्चांकी दर देत आला आहे. ही परंपरा यंदाही कायम राहणार असून गाळप हंगाम २०२३ -२४ मध्ये गाळप झालेल्या उसाला मराठवाड्यातील इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक भाव ‘समृद्धी’चा असेल असा विश्वास त्यांनी दिला.

मूर्ती फाटा ते भादली   शेतरस्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांची होती. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी येणारी ही अडचण  समृद्धी कारखान्याने
गावकऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे काम सुरु केले.या कार्यक्रमास भाजपा युवा मोर्चाचे तालुका  अध्यक्ष शिवाजीराव कंटूले, ओबीसी नेते बाळासाहेब बोरकर यांच्यासह आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या जीवनात ‘समृद्धी’ आणण्याचे स्वप्न
संघर्षाच्या काळात समृद्धी कारखान्याला शेतकऱ्यांनी साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here