Home जालना मलिदा लाटनाऱ्यांचा आपल्यावरील चिखलफेकीचा प्रयत्न हास्यास्पद

मलिदा लाटनाऱ्यांचा आपल्यावरील चिखलफेकीचा प्रयत्न हास्यास्पद

13
0

आशाताई बच्छाव

1000760886.jpg

मलिदा लाटनाऱ्यांचा आपल्यावरील चिखलफेकीचा प्रयत्न हास्यास्पद
—————————————-
आ. कैलास गोरंटयाल यांचा जोरदार पलटवार 
—————————————-
जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या जालना कारखान्याच्या मालमत्तेवर दरोडा टाकून मलिदा लाटनाऱ्यांनी आपल्यावर चिखलफेक करण्याचा केलेला प्रयत्न हास्यास्पद असल्याचा पलटवार आ. कैलास गोरंटयाल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा नामोल्लेख न करता लगावला आहे.
जालना येथील मोती तलावात श्री विसर्जनासाठी नांदेड येथून आलेल्या जीवरक्षक दलातील तरुणांना अंगावरील टीशर्ट काढण्याची धमकी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली होती. जालना महानगर पालिकेने नियमांचे सर्व सोपस्कार पार पाडत श्री विसर्जनासाठी नांदेड येथील सदर एजन्सीची निविदा मंजूर केलेली आहे. नियमानुसार काम मिळाल्यानंतरही माजी राज्यमंत्र्यांच्या समर्थकांनी टक्केवारीसाठी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आ. कैलास गोरंटयाल यांनी समाज माध्यमांवर मुंबई येथून एक व्हिडिओ व्हायरल करत माजी राज्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. या टिकेनंतर वादाची ठिणगी पडली. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज बुधवारी केलेल्या टीकेला आ.गोरंटयाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या जालना (रामनगर) सहकारी साखर कारखान्याची जमीन हडप करून या कोटयावधी रुपयांच्या मालमत्तेवर कुणी दिवसा ढवळ्या दरोडा टाकला हे जालना विधानसभा मतदार संघातील जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. केवळ मालमत्तेवर दरोडा टाकला नाही तर सदर कारखान्यातील चांगल्या स्थितीत असणाऱ्या मशिनारीची देखील भंगारच्या नावाखाली या महाशयांनी पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here