Home भंडारा लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने सावरी इथे ‘ग्रीनपार्क’ जवळ कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती

लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने सावरी इथे ‘ग्रीनपार्क’ जवळ कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती

40
0

आशाताई बच्छाव

1000759776.jpg

लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने
सावरी इथे ‘ग्रीनपार्क’ जवळ कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे मागील 20 वर्षांपासून वर्षभर सातत्याने व अखंडितपणे निशुल्करित्या विविध पर्यावरणस्नेही सण व विविध उपक्रमानी ‘लाखनी निसर्गमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून यावर्षी सावरी येथे सुद्धा सावरी ग्रामपंचायत, शिवमंदिर नागठाण देवस्थान तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे सावरी तलावावर उभारलेल्या ‘ग्रीन पार्क’ जवळ पहिल्यांदा कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती सावरीचे सरपंच सचिन बागडे यांचे सहकार्याने करण्यात आली .त्यामुळे सावरी तलावात व नाल्या- विहिरीत होणारे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबच्या पुढाकाराने टाळण्यात यश आले आहे.
गणेशभक्त कुमारेश वंजारी, शारदा वंजारी, चितेश मने, मीनाक्षी मने, मोहन रेहपाडे, शीतल रेहपाडे, बाबुराव धरमसारे, आशा धरमसारे, इत्यादी गणेशभक्तांनी घरगुती गणेश मूर्तिचे विसर्जन सावरी ‘ग्रीन पार्क’जवळील ‘ कृत्रिम गणेश विसर्जन कुंडा’त केल्याबद्दल तसेच निर्माल्यदान केल्याबद्दल सावरीचे सरपंच सचिन बागडे,लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ब्रँड अँबेसेडर प्रा. अशोक गायधने, ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी अशोक नंदेश्वर यांचे हस्ते पुष्पगुच्छ व वृक्षभेट देऊन सर्व गणेशभक्तांचा सत्कार करण्यात आला.जमलेल्या गणेशभक्तांना तलावात व विहिरी नाल्यात गणेशाचे विसर्जन केल्याने होणारे दुष्परिणाम समजावून देऊन जनजागृती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आली.
गणेश विसर्जन कुंडनिर्मितीकरिता शिवमंदिर नागठाण देवस्थानचे विश्वस्त भारत मेश्राम, उदाराम धांडे, राजेश चाचेरे, तसेच सावरी ग्रामपंचायतचे सदस्य मोहन रेहपाडे,आदित्य बागडे, भोजराम मांढरे, इंदू नान्हे, सुरेखा चाचेरे, वीणा बागडे, वंदना मेहर, पुष्पा वंजारी इत्यादीनी व सावरीचे ग्रामसेविका संगीता मारवाडे, माजी उपसरपंच विमल धांडे, बोरकर मॅडम, मडावी सर, स्वरा बागडे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here