Home बुलढाणा एलसीबीने 3 धान्य चोरांच्या आवळल्या मूसक्या ! – 200000 रुपयांची मालवाहू टाटा...

एलसीबीने 3 धान्य चोरांच्या आवळल्या मूसक्या ! – 200000 रुपयांची मालवाहू टाटा एस जप्त !

34
0

आशाताई बच्छाव

1000757295.jpg

एलसीबीने 3 धान्य चोरांच्या आवळल्या मूसक्या ! – 200000 रुपयांची मालवाहू टाटा एस जप्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- जळगाव जामोद व शेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील 4 सोयाबीन व तूर चोरीचे गुन्हे एलसीबीने उघड केले असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू टाटा एस कंपनीची 200000 रुपये किंमतीची गाडी जप्त केली आहे. याप्रकरणी पाच पैकी तीन आरोपींना गजाआड करण्यात आले.

आरोपींनी जळगाव जामोद हद्दीतील आसलगाव येथे दोन वेळा बुलढाणा अर्बन गोडाऊन मधून सोयाबीन व सुपो जीनिंग जळगाव जामोद येथील गोडाऊन मधून तूर तसेच शेगाव येथून चोरी करून खामगाव येथे हा माल विक्री केला. आरोपींनी 48000 रुपये किमतीचे 24 कट्टे सोयाबीन व 70000 रुपये किमतीचे 35 कट्टे सोयाबीन 1,78500 रुपये किमतीची 30 कट्टे तूर असे धान्य चोरी केले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकाने तपास चक्र फिरवून आरोपी अर्जुन श्रीकृष्ण हनवते, रा. आसवंद ता संग्रामपूर, आकाश संतोष वानखेडे रा. पातूर्डा, अविनाश बाळकृष्ण मेहंगे राहणार आसवद तालुका संग्रामपूर यांना अटक करण्यात आली तरअजय मेहंगे व धम्मपाल वानखडे राहणार आसवंद हे आरोपी फरार आहेत. आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मालवाहू टाटा एस कंपनीची 200000 रुपये किंमतीची गाडी जप्त केली आहे. आरोपींनी चोरलेले धान्यविक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.

Previous articleतर महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करणार ! – शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांचा इशारा ! -महसूल यंत्रणेत खळबळ
Next articleदेगलूर मधे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here