Home बुलढाणा जीभ छाटायची सोडा, गांधींच्या केसाला सुद्धा टच केल्यास एक कोटी रुपये देतो’...

जीभ छाटायची सोडा, गांधींच्या केसाला सुद्धा टच केल्यास एक कोटी रुपये देतो’ -आमदार संजय गायकवाड यांना पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचे ओपन चॅलेंज !

30
0

आशाताई बच्छाव

1000757276.jpg

‘जीभ छाटायची सोडा, गांधींच्या केसाला सुद्धा टच केल्यास एक कोटी रुपये देतो’ -आमदार संजय गायकवाड यांना पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचे ओपन चॅलेंज !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्यावर जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याचे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी गायकवाड यांना आंबेडकर विरोधी म्हणत ‘जीभ छाटायची सोडा, गांधींच्या केसाला सुद्धा टच करून दाखविल्यास एक कोटी रुपये देतो’ असे ओपन चॅलेंज केले आहे.
वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणाऱ्या आमदार
संजय गायकवाड यांच्या गोळ्या संपल्यात. केवळ प्रसिद्धीसाठी काही पण बरळायचे आणि सस्त्यातील प्रसिद्धी करून घ्यायची. जीभ छाटायची सोडा लोक काय येडे आहेत की काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय काय आमदार पाळून ठेवले हे याचे उत्तम उदाहरण आहे. आज बरे आमदार गायकवाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवले. जेव्हा बाबासाहेबांच्या लेकरांना खामगाव मध्ये जातिवाद्यांनी मारले. तेव्हा तिथे दहा हजारांची फौज घेऊन येतो. अॅट्रॉसिटीला क्रॉस केस करा असे म्हटले. दलितांवरील हल्ले होताना क्रॉस केसची भाषा करता आणि त्याची आतापर्यंत सुद्धा माफी मागू शकले नाहीत. तुम्ही काय दिवे लावले आहेत हे महाराष्ट्राला
माहित आहे जरा नीट रहा. जीभ छाटण्याची भाषा करता. जीभ छाटायची सोडा राहुल गांधी यांच्या केसाला टच केला तरी मी एक कोटी रुपये देईल. त्यांच्या घराच्या गेट जवळ जरी फिरकला तर छातीत किती गोळ्या घुसतील याची कल्पना आहे का? काय संरक्षण आहे देशाची काय यंत्रणा आहे? हे कळतंय का? आणि जीभ छाटायची भाषा करता.. तुम्ही आंबेडकर विरोधी आहात हे बुलढाण्याला माहित आहे. जीभ छाटायचे सोडा फक्त गांधींच्या केसाला हात लावून या मी एक कोटी रुपये देतो अशा परखड शब्दात ऑल इंडिया पँथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदार संजय गायकवाड यांचा सडकून समाचार घेतला.

Previous articleExclusive अखेर आमदार संजय गायकवाड यांच्यावर अ दखलपात्र गुन्हा दाखल !
Next articleतर महसूल मंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करणार ! – शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांचा इशारा ! -महसूल यंत्रणेत खळबळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here