Home बुलढाणा अखेर पैनगंगा नदी पात्रात रविंद्र नन्हईचा मृतदेह सापडला! – साखरखेर्डा हळहळले!

अखेर पैनगंगा नदी पात्रात रविंद्र नन्हईचा मृतदेह सापडला! – साखरखेर्डा हळहळले!

27
0

आशाताई बच्छाव

1000753234.jpg

अखेर पैनगंगा नदी पात्रात रविंद्र नन्हईचा मृतदेह सापडला! – साखरखेर्डा हळहळले!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
साखरखेर्डा :- बुलढाणा येथील माळीपेठ मधील रहिवासी रविंद्र बाबुराव नन्हई यांचा मृतदेह पैनगंगा नदीच्या पात्रात सापडला असून साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साखरखेर्डा येथील बाबुराव नन्हई यांना दोन मुले,
दोन मुली असून दोन्ही मुले शिर्डी येथील साईबाबा संस्थान मधील रुग्णालयात आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. साखरखेर्डा येथील किंवा परिसरातील कोणताही रुग्ण तपासणी साठी गेला असता त्याची संपूर्ण व्यवस्था हे दोघे भावंडं करीत, ऑपरेशन पासून ते औषध उपचार आपल्या भागातील नागरिकांना कसा तत्पर उपलब्ध होईल, यासाठी सहकार्य करीत. गौरी पुजन सणाला दोघे भाऊ, पत्नी, मुले, बहिण असा परिवार साखरखेर्डा येथे आला होता. शुक्रवारी ओलांडेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते. दुपारी आंघोळ करून दर्शनासाठी निघालेल्या रविंद्र नन्हईचा पाय घसरल्याने तो नदीच्या पात्रात पडला. पेनटाकळी धरणाचे सात वक्र दरवाजे
उघडण्यात आलेले असल्याने प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह नदीपात्रातून वाहात होता. त्या पाण्यात रविंद्र हा वाहून गेला. ही बातमी साखरखेर्डा आणि परिसरातील गावांना समजताच अनेक युवक दुधा ब्रम्हमपुरी येथील ओलांडेश्वर येथे गेले. काल १३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपासून शोध घेतला असता तो कोठेही आढळून आला नाही. आज १४ सप्टेंबर रोजी सकाळी बचाव पोलीस पथकाने शोध मोहीम हाती घेतली असता, ब्रम्हपुरी जवळ पैनगंगा नदीपात्रात १०:४० वाजता रविंद्रचा मृतदेह आढळून आला. रविंद्र बाबुराव नन्हई यांच्या अपघाती मृत्यूनंतर साखरखेर्डा येथील भोगावती नदी काठावरील हिंदू स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला.

Previous article८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
Next article‘संसार उध्वस्त होतोय.. साहेब कारवाई करा!’ – मौजे पिंपळनेर येथे वाहताहेत अवैध दारूचे लोट ! –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here