
आशाताई बच्छाव
तलाठी संतोष पवार यांने फेरफार साठी अवास्तव पैसे मागीतले म्हणून डोळ्यात मिर्ची पावडर टाकुन खुन
अकार्यक्षम, सज्यात न रहाणाऱ्या आणी लाच स्वरुपात पैसे मागणाऱ्या तलाठ्यास जोड्यांनी मारुन त्यांच्या तोंडाला काळे फासून “त्यांची गाढवावर बसवुन” धिंड काढणार- प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 14/09/2024
हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुआ गावातील संतोष पवार या तलाठ्याने आरोपी प्रताप कराळे यांच्या फेरफार साठी आवास्त पैसे “लाच”मागीतली यातील कांही पैसे तलाठ्याला दिले होते. परंतु या लाचखोर तलाठ्याची भुकच भागत नव्हती, त्याने जास्तीचे आगावु पैस्याची मागणी केली, प्रताप कडे जास्तीचे पैसे नसल्याने तो देऊ शकला नाही. त्याला फेरफार नसल्याने दैनंदिन आडचण होत होती.
फेरफार करून द्या असे वारंवार तलाठी संतोष पवार याला सांगून देखील त्याने फेरफार मंजुर केला नाही. हा राग धरुन एक दिवशी आडगाव रंजेबुआ येथे तलाठी संतोष पवार एकटा आसल्याचे बघुन बोरी सावंत या गावातील प्रताप कराळे यांचा आणि तलाठी संतोष पवार यांच्याशी फेरफार नोंदीच्या कारणावरून वाद झाला आणी प्रताप कराळे याने तलाठी संतोष पवार याच्या डोळ्यात मिर्चीची पावडर टाकून पोटात चाकुचे वार करुन त्याचा खुण केला . कांही वेळातच तलाठी संतोष पवार यांचा म्रत्यु झाला.
तलाठी संतोष पवार यांच्या मृत्यूस जिम्मेदार आसलेल्या आरोपी प्रताप कराळे याला कठोर शिक्षा झालीच पाहीजे, डोळ्यात मिर्ची टाकणे, खुण करणे या पद्धतीचा आम्ही निषेध करतो.
प्रताप कराळे याने तलाठी संतोष पवार यांच्या विरोधात यवढे कडक पाऊल का उचलले,डोळ्यात मिर्ची पावडर टाकून त्याने का खुण केला या बाबत महसुल विभागाच्या अधिकाऱ्याने चौकशी केली पाहीजे.
तलाठ्याची ही जात पाकिस्तान च्या शत्रु पेक्षाही भयावह आहे.जर तलाठ्याने असाच त्रास शेतकऱ्यांना दिला तर भविष्यात जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.
राज्यातील तलाठी तथा महसूल विभागाचे सर्वच अधिकारी -कर्मचारी कमालीचे भ्रष्ट झाले आहेत. 7/12 उतारा साठी, फेरफार नोंदी साठी ते आवास्तव पैसे मागतात हे चुकच आहे.कायद्याने त्यांची घरे सज्यात आसली पाहीजेत, त्यांचे कार्यालय सज्यात आसले पाहीजेत पण त्यांचं कार्यालये शहराच्या ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांना तलाठ्याकडच्या कामा साठी शेतात मजुर लावुन शहराच्या ठिकाणी जावे लागल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मध्यंतरी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत सज्यात न रहाणाऱ्या तलाठी,ग्रामसेवक, गिरदावर, शिक्षक, आणी डाॅक्टर यांच्यावर कार्यवाही झाली पाहीजे याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
तलाठी, ग्रामसेवक, गिरदावर, शिक्षक आणी डाॅक्टर यांनी माझे घर सज्यात आहे. असे खोटे पत्र देऊन कोट्यावधी रुपयाचे घरभाडे उचलले आहे. हे पुर्णपणे बेकायदेशीर आहे. याची चौकशी झाली पाहीजे म्हणून आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतिने आंदोलन करणार आहोत.
जे तलाठी ग्रामसेवक, गिरदावर, शिक्षक आणि डाॅक्टर सज्यात रहात नाहीत, आणि सज्यात रहातो म्हणून घरभाडे उचलतात, अश्या तलाठ्या विरुद्ध खोटे घरभाडे उचलल्याने त्यांच्या विरोधात 420 अन्वये गुन्हे दाखल करावे म्हणून आंदोलन करण्यात येणार असुन,या शासनाची फसवणूक करणार्या तलाठ्यांच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवून धिंड काढणार आसल्याचे प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांनी बीड, परभणी, नासीक पुणे, तुळजापुर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत जाहीर केले
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अवाहन करतो की, जो तलाठी, ग्रामसेवक, गिरदावर, डाॅक्टर सज्यात रहात नाहीत, 7/12 साठी फेरफार साठी पैसे मागत असेल तर मला खालील फोन नंबर वर आपले नाव, गाव,तालुका, जिल्हा तलाठ्याचे नाव, सज्जा सह लेखी स्वरूपात पत्र पाठवा त्या तलाठ्यास लाचलुचपत खात्या मार्फत ट्रॅप करुन आपले काम मोफत करुन देऊ.प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती. संपर्कासाठी 8888184444, 9673288000 “8055088888 ,9422469677 7498286330 वरिल संपर्क नंबर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिले आहेत.