Home जालना राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची विद्यार्थिंनी श्रेया वाजे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम

राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची विद्यार्थिंनी श्रेया वाजे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम

25
0

आशाताई बच्छाव

1000746486.jpg

राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची विद्यार्थिंनी श्रेया वाजे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक.१४/०९/२०२४
जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या
वर्ग आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रेया पांडूरंग वाजे हिने गणपती
नेत्रालय,जालना मार्फत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता
आठवी ते दहावीच्या गटातून जालना जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला
आहे. गणपती नेत्रालयामार्फत आयोजित बक्षीस वितरण समारंभात तिचे
मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,ट्रॉफी देऊन पालकांसह सन्मानित करण्यात
आले.
या यशाबद्दल तिचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,समर्थ शिक्षण
प्रसारक मंडळ उपाध्यक्ष प्रा.राम कदम,सचिव बिजू वाघमारे, संचालक रामचंद्र
चौधरी,हरिहर शिंदे,नंदकुमार जाधव,शोभाताई अंबेकर, अश्विन अंबेकर,
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे,प्रा.डॉ.सुहास सदाव्रते, आर.आर.
जोशी,राजेभाऊ मगर, राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनीष
अग्रवाल, उपमुख्याध्यापक गिरीश दशरथ, श्रेयाचे वर्गशिक्षक
नागोरी,कलाशिक्षक ठोंबरे,जेथलिया,गाडेकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक,
गायत्री नगर मधील रहिवाशी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
०००००००००००००
फोटो ओळी…..
१०- राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या वर्ग आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी
श्रेया पांडूरंग वाजे हिने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता
आठवी ते दहावीच्या गटातून जालना जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला
आहे. त्याबद्दल तिचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,ट्रॉफी देऊन
पालकांसह सन्मानित करण्यात आले.

Previous articleवसमत शहरातील कुंभारवाडा भागातील प्रभाग क्रं 1मध्ये सभागृहाच्या कामाचे भुमीपुजन .
Next articleबदनापूर तालुक्यातील प्रकार सहा आरोपींनी रस्त्यात अडवून चाकूहल्ला करत तरुणीला केले जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here