Home बुलढाणा चक्क..जिल्हा परिषद शाळेलाच ठोकले कुलूप ; एकही शिक्षक नसल्याने उचलले हे पाऊल...

चक्क..जिल्हा परिषद शाळेलाच ठोकले कुलूप ; एकही शिक्षक नसल्याने उचलले हे पाऊल !

29
0

आशाताई बच्छाव

1000746283.jpg

चक्क..जिल्हा परिषद शाळेलाच ठोकले कुलूप ; एकही शिक्षक नसल्याने उचलले हे पाऊल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळेला एकही शिक्षक नसल्याने शाळा समिती अध्यक्ष फिरोज पठाण यांनी १२ सप्टेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. केंद्रीय मराठी शाळेमध्ये १ ली ते ५ पर्यंत उर्दू शाळा आहे. गटशिक्षणाधिकारी आर आर पाटील चिखली यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते, कि मंगरूळ नवघरे शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
तरी तुम्ही आमच्या शाळेला शिक्षक उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन दिले होते. परंतु गटशिक्षणाधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतली नाही. या शाळेला शिक्षक शिक्षणाचे नसल्यामुळे नुकसान होत असल्याने होत असल्याने शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व शाळा समिती यांनी शाळेला कुलूप ठोकले. शाळेला कुलूप ठोकल्यामुळे प्रशासनाला जाग येणार का मुलांच्या भविष्यासाठी ‘मंगरूळ नवघरे’ शाळेला शिक्षक उपलब्ध करून देणार का याकडे शाळा समिती व पालक वर्गाचे लक्ष लागून आहे.
जोपर्यंत या शाळेला शिक्षक देणार नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही, अशी माहिती केंद्रप्रमुख हाडोळे सर यांना दिले आहे अक्षरशः पाहता जिल्हा परिषद शाळेमधील मुला मुलींची संख्या कमी होत आहे व खाजगी शाळेमध्ये पालक वर्गाचा कौल असून सुध्दा या शाळेमध्ये मुले शिकण्याची इच्छा असून सुद्धा प्रशासन या शाळेला शिक्षक देत नसल्याने प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहे. यावेळी फिरोज खा अफसर खा पठाण यांच्यासह उपाध्यक्ष शेख सादीक शेख आमद शेख, अहेमद शेख समद अ अतिक, अ गणी निसार खा सलाम खा, सै राजू लूखमान व पालक वर्ग यांनी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here