Home बुलढाणा समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी करणाऱ्या गँगची इनसाईड स्टोरी ! उर्वरित आरोपीही पोलीसांच्या...

समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी करणाऱ्या गँगची इनसाईड स्टोरी ! उर्वरित आरोपीही पोलीसांच्या गळाला; एक तर कपशीच्या शेतातील तुरीच्या पाट्यात लपला होता, पोलिसांनी असा लावला शोध….

70
0

आशाताई बच्छाव

1000746268.jpg

समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी करणाऱ्या गँगची इनसाईड स्टोरी ! उर्वरित आरोपीही पोलीसांच्या गळाला; एक तर कपशीच्या शेतातील तुरीच्या पाट्यात लपला होता, पोलिसांनी असा लावला शोध….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळगाव राजा तालुका समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला पकडल्याची घटना आज, १३ सप्टेंबरच्या सकाळी बिबी पोलीस स्टेशन हद्दीत घडली हो A पोलीस पाठलाग करत असल्याने चोरट्यांची कार कठड्याला धडकून अपघातग्रस्त झाली होती.
सकाळी बिबी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. पोलीस पाठलाग करत असल्याने चोरट्यांची कार कठड्याला धडकून अपघातग्रस्त झाली होती. त्यातील चालक पोलिसांच्या हाती लागला होता, उर्वरित चोरटे पळून गेले होते. बिबी पोलिसांनी ३५ लिटरच्या १० कॅन जप्त केल्या होत्या. दरम्यान आता या प्रकरणात अपडेट माहिती समोर आली असून पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. चालकासह एकूण ४ चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी अपघातग्रस्त वाहनातून चालक ज्ञानेश्वर फकीरबा सोसरे ताब्यात घेण्यात आले होते. आणखी ३ जणांसह समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतांना शुभम दीपक उबरहंडे (२५, रा.चिखली) याला मलकापूर पांग्रा येथे पळ जातांना पोलिसांनी पकडले. त्याच्या चौकशीतून त्याने भैय

नावाच्या एका आरोपीचे नाव सांगितले. या भैय्यानेच डिझेल
चोरीसाठी सर्व साहित्य व गादीची व्यवस्था केल्याचे त्यांनी
उबरहंडे (२५, रा.चिखली) याला मलकापूर पांग्रा येथे पळून जातांना पोलिसांनी पकडले. त्याच्या चौकशीतून त्याने भैय्या नावाच्या एका आरोपीचे नाव सांगितले. या भैय्यानेच डिझेल चोरीसाठी सर्व साहित्य व गाडीची व्यवस्था केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. शुभम कडून पोलिसांनी भैय्या चा मोबाईल नंबर मिळवला…

तुरीच्या शेतात लपला होता भैय्या…

दरम्यान मोबाईल लोकेशन वरून पोलिसांना भैय्या चा पत्ता सापडला. मांडवा येथील भीमराव दगडू इंगळे यांच्या कपाशीच्या शेतातील तुरीच्या पाट्यात तो लपलेला होता. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्या भुवयांना जखम झाल्याचे पोलिसांना दिसले. त्यानेही डिझेल चोरीची कबुली दिली. भैय्या चे नाव हर्षद पांडुरंग साबळे (रा. डौलखेड, ता. जाफ्राराबाद) असे आहे. भैय्याच्या चौकशीतून त्याने त्याचा साथीदार शेळगाव आटोळ येथील संकेत सुनील बोर्डे याचे नाव सांगितले. संकेतला पोलिसांनी मलकापूर पांग्रा येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातून ५० लिटर डिझेल, ईरटीका कार आणि प्लॅस्टिकच्या कॅन असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Previous articleग्रामविकास मंत्र्यांच्या जामनेर मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था बिकट! गिरीश महाजनांना तरुणांनी विचारला जाब,
Next articleचक्क..जिल्हा परिषद शाळेलाच ठोकले कुलूप ; एकही शिक्षक नसल्याने उचलले हे पाऊल !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here