Home बुलढाणा चिखली मध्ये स्टॅम्प चा कृत्रिम तुटवडा शेतकरी हवालदिल जगावे का मारावे चिखली...

चिखली मध्ये स्टॅम्प चा कृत्रिम तुटवडा शेतकरी हवालदिल जगावे का मारावे चिखली तहसीलदार यांनी लक्ष देण्याची गरज.

17
0

आशाताई बच्छाव

1000744182.jpg

चिखली मध्ये स्टॅम्प चा कृत्रिम तुटवडा शेतकरी हवालदिल जगावे का मारावे चिखली तहसीलदार यांनी लक्ष देण्याची गरज.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मागीलवर्षी चे 2023 चे सोयाबीन अनुदान साठी हेक्टरी 5000 अनुदान देण्याचे ठरले आहे परंतु काही शेतकरी हे सामुहिक क्षेत्र असल्यामुळे त्यांची नावे यादीमध्ये आली नाही त्यांच्यासाठी कृषी विभागांमध्ये सामूहिक क्षेत्र हे स्टॅम्प पेपरवर अपडेट करून आणा आसे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देण्याचे निर्देश चिखली तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर यांनी एका पत्रकाद्वारे काढले आहे त्यामुळे स्टॅम्प ची अत्यंत गरज असल्यामुळे सर्व शेतकरी स्टॅम्प घेण्यासाठी चिखली तहसीलच्या जुन्या तहसील मध्ये गेले असता काही शेतकऱ्यांना शंभर रुपयाचे स्टॅम्प हा तीनशे रुपये देण्याचे काही स्टॅम्प विक्रेते हे खेळ खेळत आहे सदर स्टॅम्प विक्री तसेही 100 रुपयाचा स्टॅम्प एकशे दहा रुपयाला विकत ही सुद्धा सर्वसामान्यांची पिळवणूक आहे शेतकऱ्यांना व सर्व सामान्य लोकांना स्टॅम्प देण्यासाठी आधार कार्डची मागणी सुद्धा केली जात आहे हे जर सर्व नेमाने चालते तर स्टॅम्प विक्री का नियमाने चालत नाही आसा सवाल उपस्थित होत आहे आता तर यांनी हद्दच केली सदर शंभर रुपयाचे स्टॅम्प हे तीनशे रुपयांनी विक्री करत आहे आणि शेतकरी शेतकरी हा आज आसमानी आणि सुलतानी संकट अशी लढत असतानाच या आर्थिक संकटाशी ही लढत आहे शेतकरी हा यावर्षी निसर्गाने शेतकऱ्याला साथ न दिल्यामुळे चिखली तालुक्यातील भरपूर मंडळ आसे आहेत की त्या ठिकाणी सोयाबीनला शेंगाची लागल्या नाहीत आणि ज्या काही लागले आहेत त्याचे प्रमाण अत्यल्प आहे नदी नाले सर्व कोरडे आहेत चिखली तालुक्यामध्ये नेतांत पाण्याची आवश्यकता असताना सध्या निसर्गाचे पाणी पडत नाही त्यामुळे शेतकरी अहवाल दिल झाला आहे आता जगावे का मारावा असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यापुढे पडला आहे त्यातच आता शंभर रुपयाचे स्टॅम्प साठी जर तीनशे रुपये द्यायचे तर हे आणायचे कुठून आणि ही फसवणूक होत असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येत आहे या बाबीकडे चिखली तहसीलचे मान्य तशिलदार संतोष काकडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे सदर तुटवडा हा कृत्रिम असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे तरी चिखली तहसीलदार यांनी या बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना या आर्थिक भुर्दंडातुन वाचवावे ही सर्व सामान्य जनतेची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here