Home जालना जालना गणेश महासंघातर्फे भव्य कब्बडी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन – अशोक पांगारकर

जालना गणेश महासंघातर्फे भव्य कब्बडी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन – अशोक पांगारकर

23
0

आशाताई बच्छाव

1000740087.jpg

जालना गणेश महासंघातर्फे भव्य कब्बडी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन – अशोक पांगारकर
—————————————-
नामांकित मल्ल ठरणार आकर्षण @ रोख बक्षिसांची लयलूट @ क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा —————————————-जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) श्री जालना गणेश महासंघातर्फे भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी कब्बडी स्पर्धा तर शनिवार रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धेसाठी ट्रीपल महाराष्ट्र केसरी पै.विजय चौधरी व महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख यांची विशेष उपस्थिती राहणार असून क्रीडा रसिकांनी या स्पर्धेसाठी उपस्थीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी केले आहे.
शहरातील चंद्रशेखर आझाद मैदानावर उद्या शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता  ६५ किलो वजनी गटातील मुलांची तर मुलींच्या ५५ किलो वजनी गटातील भव्य कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी शहरातील चंद्रशेखर आझाद मैदानावर सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत मराठवाड्यासह राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. कुस्ती स्पर्धेत सहभागी मल्लांना १०० पासून २१ हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार असून या स्पर्धेतील विजेत्या मल्लाला रोख १ लाख ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार असल्याचे जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी सांगितले. पुणे येथील नामवंत मल्ल महाराष्ट्र केसरी प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here