आशाताई बच्छाव
हेल्थ एटीएम मशीन मानद नामांकन विनाच!
तालुक्यातील ६ आरोग्य केंद्रात हेल्थ एटीएम ३ आरोग्य केंद्र एटीएम विना!
गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील 32 आरोग्य केंद्रात हेल्थ एटीएम मशीन उपलब्ध असल्याची माहिती निष्फळ
आरोग्य यंत्रणेने कामाची नक्कल, खरेदी प्रक्रिया, दर निश्चिती, उपयोगिता प्रमाणपत्र, शासकीय यंत्रणेचे प्रमाणपत्रे जोडली नाहीत!
गोंदिया (संजीव भांबोरे): हेल्थ एटीएम खरेदी संबंधात आरोग्य विभागाने लागणारे उपकरण बाह्यस्त्रोताद्वारे अगोदरच खरेदी केली
आहे.असे पत्र दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले होते.मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी, अगोदर पासून सेवा व वैद्यकीय उपकरणे असताना देखील कोणतेही मावदंडे विचारात न घेता परस्पर संगणमत करून आरोग्य विभाग मार्फत निधी मागणी खनि कर्म विभागाकडून दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ला उपलब्ध करून दिला. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिशाभूल करून निधीचे सामंजस्य न ठेवता गौड बंगाल झाले असावे असे निदर्शनास आले आहे.अनियमित रुग्णांच्या आरोग्याची पूर्ण तपासण्या या एटीएम मशीन मधून काढल्या जात नाहीत.अशा हेल्थ मशीन घेऊन उपयोग काय? या प्रकरणाची, शासनाने चौकशी करून निधी HAL संस्थेकडून वसूल करून त्यांना जिल्ह्यात बंदी घालावी.अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदुस्तान एंटीबायोटिक लिमिटेड HAL पिंपरी चिंचवड पुणे ह्या संस्थेने दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांना आपल्या हेल्थ एटीएम ही यंत्रसामुग्री खरेदीचे प्रस्ताव आरोग्य विभाग यांना दिले.आरोग्य सेवा रुग्णालय मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध मापदंडे, रुग्णांचे वजन, उंची, रक्तदाब, तापमान, रक्त व लघवीतील तपासण्या जसे शुगर, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल ह्या चाचण्या तपासणी करण्यासाठी उपकरण सेवा खरेदी केली आहे.मात्र, पुन्हा आरोग्य विभागाने खनिक्रम विभागाला मागणी अर्ज करून निधी उपलब्ध करून दिला. आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि , खनिकर्म विभागातील जिल्हा खणीकर्म अधिकारी व HAL या संस्थेने संगणमताने कुठलीही खरेदी प्रक्रिया व नकलीकरण याची शहानिशा न करता शासनाची दिशाभूल करून निधी परस्पर गहाळ केले असावे. हेल्थ एटीएम मशीन नामांकन विना असल्यामुळे खान बाधित क्षेत्रातील जनतेसाठी आरोग्य मूळ सुविधा पासून वंचित जनतेने आवाज उठविला आहे.