Home भंडारा उत्खननाची रायल्टी चोवा येथील व उत्खनन मात्र मौदी येथील -माजी सरपंच जयश्री...

उत्खननाची रायल्टी चोवा येथील व उत्खनन मात्र मौदी येथील -माजी सरपंच जयश्री वंजारी यांची चौकशीची मागणी

94
0

आशाताई बच्छाव

1000738736.jpg

उत्खननाची रायल्टी चोवा येथील व उत्खनन मात्र मौदी येथील -माजी सरपंच जयश्री वंजारी यांची चौकशीची मागणी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)मौजा मौदी येथील टेकड्यांचे अवैध प्रकारे उत्खनन होत असल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि अस्तित्व धोक्यात आले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की गट क्रमांक 37 मौदी या ठिकाणी अवैध उत्पन्न होत आहे.मात्र रॉयल्टी चोवा गट क्रमांक 83/3 येथील काढलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे शासनाच्या तिजोरीची दूर होत आहे.तसेच अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे .भंडारा तालुक्यातील मौदी अंभोरा या रस्त्याचे काम चालू असून अवैध उत्खननाचे बळी ठरली आहे परंतु महसूल व खनिज कर्म विभाग निद्रा अवस्थेत आहे. जिल्ह्यातील निसर्गनिर्मित टेकड्यांचे सौंदर्य मनमोहक आहे. परंतु मानवी अतिक्रमण व अवैध उत्खननाने पर्यावरणाची व शासनाच्या महसुलाची लूट होत आहे. भंडारा तालुक्यातील मौदी येथील टेकडीचे असेच लूट होतो आहे. पहेला ते अंभोरा रोड सिमेंटकरण होत असल्यामुळे बाजूचे भरण करण्याकरिता मौजा चोवा येथील रायल्टी काढून त्या रॉयल्टी च्या नावाने उत्खनन मात्र मौदी हद्दीत होत आहे. परंतु महसूल व खनिज कर्म विभाग निद्रा अवस्थेत आहे. याच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने संबंधित विभागाने लक्ष देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद माजी सरपंच जयश्री वंजारी यांनी केलेली आहे.

Previous articleहिंगोली जिल्ह्याचे मागासलेपणाची ओळख पुसून काढणार.माजी खा. हेमंत पाटील
Next articleगोसेखुर्द प्रकल्प बाधित उर्वरित गावांचे पुनर्वसन तात्काळ पुनर्वसन करा – जिल्हाधिकारी यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here