Home भंडारा प्रबोधनकार संघटनेच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्यांचा सत्कार

प्रबोधनकार संघटनेच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्यांचा सत्कार

66
0

आशाताई बच्छाव

1000735876.jpg

प्रबोधनकार संघटनेच्या वतीने वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्यांचा सत्कार

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी)प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जेष्ठ नाट्यकलावन्त भूमालाताई उईके यांचे राहते घरी वृद्ध कलावन्त मानधन समिती सदस्य यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
त्या प्रसंगी 3 वर्षा पासून जिल्ह्यात वृद्ध मानधन कलावंत समिती नव्हती त्या साठी संघटनेच्या वतीने 29 जुलै 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे संगीतमय आंदोलन करण्यात आले होते.
त्या आंदोलनाची दखल घेत शासनाने वृद्ध कलावन्त मानधन समिती तयार केली. त्या मध्ये साकोली तहसील मध्ये प्रा.नरेश देशमुख कवी साहित्यिक व परमानंद गहाने निर्माता व नाट्य कलावन्त यांची निवड करण्यात आली.
त्यामुळे प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने प्रा.नरेश देशमुख , परमानंद गहाने यांचा सत्कार करण्यात आला.
त्यामुळे प्रबोधनकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, जेष्ठ नाट्य कलावन्त भूमालाताई उईके, संघटनेचे केंद्रीय संयोजक मनोज कोटांगले, जेष्ठ तबलावादक तिर्थानंद बोरकर, साकोली तालुका समन्वयक उमेश भोयर, अध्यक्ष धनंजय धकाते उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, गुड्डू बोरकर, संदीप कोटांगले, प्रशांत भोंगाडे, हासराम तुमसरे, झनकलाल लांजेवार सा. कार्यकर्ता, संकल्प &आरुष कोटांगले उपस्थित होते.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणी साठी शनिवारी बैठकीचे आयोजन.
Next articleठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर क्षितिजा जोंधळे नी घेतली गरुड भरारी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here