Home बुलढाणा मनमानी! बदली ठिकाणी जॉईन न होता अभियंता योगेश देशमुख पाहतात नगरपालिकेचा कारभार...

मनमानी! बदली ठिकाणी जॉईन न होता अभियंता योगेश देशमुख पाहतात नगरपालिकेचा कारभार ! – अभियंता योगेश देशमुख यांनी कोट्यावधी रुपयांचे बिल काढल्याचा आरोप ! -नपाने रोखले वेतन, पण नगरपालिका महेरबान ?

21
0

आशाताई बच्छाव

1000733504.jpg

मनमानी! बदली ठिकाणी जॉईन न होता अभियंता योगेश देशमुख पाहतात नगरपालिकेचा कारभार ! – अभियंता योगेश देशमुख यांनी कोट्यावधी रुपयांचे बिल काढल्याचा आरोप ! -नपाने रोखले वेतन, पण नगरपालिका महेरबान ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा वरिष्ठाचा वचक राहिला नाही त्यामुळे नगरपालिकेत कर्तव्यनिष्ठाही राहिली नसून, अभियंता योगेश देशमुख मनमानी करीत असल्याचा आरोप होतोय. देशमुख हे वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना बुलढाणा नगर परिषदेचा कारभार पाहत आहेत. परिषदेने त्यांचे 30 एप्रिल नंतरचे वेतन सुद्धा रोखले आहे. त्यांचा अमरावती विभागातील 6 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे. या अभियंतावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री

आहे. या अभियतावर कारवाई न झाल्यास मुख्यमत्री कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे.
बुलढाणा नगर परिषदेतील अभियंता योगेश देशमुख यांचा मनमानी कारभार सुरू असून 30 एप्रिल पर्यंतची मुदत संपूनही अभियंता देशमुख बोदवड नगरपरिषद या बदलीच्या ठिकाणी अद्यापही जॉईन झाले नाही. वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना व नगरपालिकेने 30 एप्रिल नंतरचे वेतन रोखले असताना, देशमुख नगरपालिकाचा कारभार पाहत आहेत. दरम्यान त्यांनी 30 एप्रिल नंतर कोट्यावधी रुपयांची विकास बांधकामाचे बिल
काढले आहे, असे धीरज अवसरमोल यांनी आरोप केला आहे. नगरपालिका देखील देशमुख यांच्यावर मेहरबान असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. धीरज अवसरमोल यांनी या अभियंता विरोधात केलेल्या तक्रारीची डेप्युटी सीओ दिगंबर साठे यांना कल्पना नाही. साठे यांना अभियंता देशमुख यांच्या बदलीबाबत विचारणा केली तर ते उडवा उडवीची उत्तरे देतात. त्यामुळे अभियंता योगेश देशमुख वर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 5 ऑक्टोबर पासून मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे उपोषण करण्याचा इशारा प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे.

Previous articleशिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या ! -खाजगी शाळेवर करीत होते विद्याधानाचे कार्य !
Next articleबस चालक व कंडक्टरने दुचाकीस्वाराला चोपले! काय आहे कारण? – चालक व कंडक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here