Home बुलढाणा भय इथले संपेना! अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत मातृत्व लादले !

भय इथले संपेना! अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत मातृत्व लादले !

24
0

आशाताई बच्छाव

1000725494.jpg

भय इथले संपेना! अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत मातृत्व लादले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
लोणार :- बुलढाणा अलीकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण काही कमी होत नाहीये. महिला, युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आ वासून उभा असताना लोणार तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तीला कुमारी माता बनवत मातृत्व लादल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेबाबत पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महादेव केशव थापडे रा गुंधा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून
बाबत बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. त्यामुळे सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली व तिने एका बाळास जन्म दिला.

दरम्यान आरोपींविरुद्ध लोणार पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक २७१/२०२४ कलम ३७६, ३७६ (२) (j), ४५२,५०६ भादवी सह कलम ४,५, (जे) (२), ६ लैंगिक बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखलपुण्यात आला. आरोपीला अटक करत न्यायालया समोर उभे केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड जमादार पंडित नागरे करीत आहेत.

Previous articleशेतात पाणी.. डोळ्यात पाणी ! कृषी विभागाची मनमानी तर सरकारची लबाड वाणी !
Next articleशिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या ! -खाजगी शाळेवर करीत होते विद्याधानाचे कार्य !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here