Home उतर महाराष्ट्र अशोकनगर येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या दफनभूमीसाठी ग्रामपंचायती कडे जागेची मागणी

अशोकनगर येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या दफनभूमीसाठी ग्रामपंचायती कडे जागेची मागणी

16
0

आशाताई बच्छाव

1000722724.jpg

अशोकनगर येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या दफनभूमीसाठी ग्रामपंचायती कडे जागेची मागणी
———————————————
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)तालुक्यात अशोकनगर या ठिकाणी मागासवर्गीय दलित समाजाची मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असल्याने मागासवर्गीय दलित समाजाच्या व्यक्तीच्या दफनविधी करीता अत्यंत अडचण निर्माण होत आहे. या विषयासंदर्भात निपाणी वडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. प्रशांत दर्शने व सरपंच सौ. सविता योगेश देवकर यांना दफनभूमीचे जागेच्या मागणीचे सह्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.त्याप्रसंगी निवेदन देताना प्रशांतराजे शिंदे,भारत वैरागर,रवींद्र अंकुश,डॉ. प्रवीणराजे शिंदे,सुखदेव साळवे,योगेश देवकर,विलास जाधव,अण्णा मोरे,जालिंदर उंडे, योगेश जाधव,जालिंदर पारखे,अशोक बार्से, राहुल जाधव,संभाजी जाधव,आदी उपस्थित होते. या निवेदनावर संदीप तोरणे,चंद्रकांत येवले,अजय वैरागर, प्रसन्ननीत शिंदे,अभिषेक शिंदे, विराज साळवे,अनिल वैरागर,शामराव घोरपडे. प्रणवराज शिंदे.आदी सह अनेक महिला व नागरिकांच्या सह्या आहेत. या विषया संदर्भात राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर, मा.उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर, व मा. तहसीलदार साहेब श्रीरामपूर यांना अशोकनगर येथील मागासवर्गीय समाजाचे एक शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटून जागेच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती श्री. प्रशांतराजे शिंदे व भारत वैरागर यांनी सांगितले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here