Home बुलढाणा ब्रेकिंग ! तब्बल 4 लाख 35 हजाराचा गांजा पकडला ! -जिल्ह्यात गांजा...

ब्रेकिंग ! तब्बल 4 लाख 35 हजाराचा गांजा पकडला ! -जिल्ह्यात गांजा तस्करीचे पाळेमुळे खणण्याची गरज !

22
0

आशाताई बच्छाव

1000719150.jpg

ब्रेकिंग ! तब्बल 4 लाख 35 हजाराचा गांजा पकडला ! -जिल्ह्यात गांजा तस्करीचे पाळेमुळे खणण्याची गरज !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मलकापूर :-बुलढाणा रेल्वेतून गांजा तस्करी करताना एकाला नांदूरा रेल्वे पोलिसांनी
बेड्या ठोकल्या असून 4 लाख 35 हजार रुपयांचा गांजा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात गांजा तस्करी वाढल्याचे चित्र असून पोलिसांनी गांजा तस्करीचे पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ मंडळ, मुख्यालय वहेडकॉटर मुंबई द्वारे दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करीत डीएससीआर, बीएसल यांना गुप्त माहिती मिळाली की, रेल्वे नंबर 12 843 मधील बी 5 कोच मध्ये एक संशयित व्यक्ती बॅग घेऊनप्रवास करीत आहे. या गंभीर सूचनाचे पालन करीत सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रेल्वे
नांदुरा स्टेशन येथे आगमन करण्यापूर्वीच एक रेल्वे पोलीस पथक स्थानकावर पोहोचले. निरीक्षक मलकापूर जसबीर राणा, सहाय्यक उपनिरीक्षक बीएस तांगर, प्रधान आरक्षक, सदानंद शर्मा, आरक्षक प्रदीप इंगळे, सीबीआय- बीएसएल टीम यांचा पथकामध्ये समावेश होता. दरम्यान ट्रेन नंबर 12843 चा के बी 5 मध्ये संशयित आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या 5 बॅगेमध्ये 43.536 केजी गांजाचे 23 पॉकेट आढळून आले. या गांजाची किंमत 435360 रुपये सांगितली जात आहे. बली मंडल एस/ओ विश्वेश्वर महतो वय 30 रा. गडाई नोबारर जयगीर मालदा पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. आरोपी नांदुरापर्यंत प्रवास करत होता. आरोपीला पुढील कारवाई साठी शेगाव जीआरपी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

Previous articleरेणापूर येथे पुरात वाहून गेलेल्या तरुणांना आर्थिक मदत. ईजी. दामिनीताई दादाराव पाटील ढगे
Next articleमोताळ्यातून ‘मशाल यात्रे’ चा श्रीगणेशा! -151 गावांत ‘मशाल यात्रा’ जाऊन समस्या ऐकून घेणार ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here