Home जालना गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धीविनायकी-वसंतराव देशमुख

गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धीविनायकी-वसंतराव देशमुख

14
0

आशाताई बच्छाव

1000719091.jpg

गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धीविनायकी-वसंतराव देशमुख
गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धिविनायकी ही असे म्हणतात. या दिवशी गणपतीचे आगमन होते आणि आपण सर्वजण गणपती बाप्पा मोरया असे म्हणतो. मोरया याचा अर्थ नमस्कार माझा श्री गणपतीला नमस्कार असो, शिवाय मोरेश्वर नावाचे एक गणपतीचे मोठे भक्त होते. त्यांच्या प्रचंड भक्ती मुळे त्यांचे नाव गणराया बरोबर जोडले गेले. गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची चतुर्थ अवस्था. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण 33 कोटी देव मानले आहेत परंतु गणनायक, गजानन एकच आहे. गणपती हे जनसामान्यांचे दैवत आहे. गणपतीच्या स्वरूपामधून विद्वान लोकांना परब्रम्हाचा साक्षात्कार होतो. माऊली ज्ञानेश्वरांना गणपतीच्या ठाई वेद प्रतिपाद्य आत्मस्वरूप दिसले. तर रामदास स्वामींना केवळ गणपतीच्या दर्शनाने आपले मनोकामना पुरवण्याचे सामर्थ्य जाणवले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची मुहर्त मेढ पुण्यात रोवली गणपती स्थापना करून. गणपती हा कालानुरूप चालणारा देव आहे. अश्मयुगामध्ये आपल्या स्वतःचाच राग मोडलेला दात हाती घेऊन त्याच्या साह्याने गणपती लढले. लोहयुगात परशु आणि अंकुश धारण केले कलियुगामध्ये धूम्रवर्ण म्हणून गणपती ओळखला जातो. गणपती करता आहे ब्रह्मव्यत्ता आहे. तो विरक्त नाही भोक्ता आहे. कला कौशल्याचा उद्घाता आहे रणांगणात नेता आहे. समाजात शास्त्र आहे आणि संकटग्रस्तांचा त्राता आहे. गणपती म्हणजे समूहाचा पती म्हणजेच नेता तो गुणपती देखील आहे. तो विज्ञान पती पण आहे मराठी माणूस शिकू लागतो ते श्री गणेशाय नमः म्हणूनच . कथा कीर्तनामध्ये गणपतीचे मंगलाचरण होते. तसेच तमाशाच्या फडामध्ये प्रथम गणेश वंदन होते. ओम नमोजी गणनायका या शब्दांमध्ये रामदास स्वामींनी गणपतीला गौरविले आहे. वेध व्यास यांना लेखन करण्याची स्मृती मिळत नव्हती कारण की त्यांनी प्रथम श्री गणेशाचे स्मरण केले नव्हते. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून त्यांनी गणपतीची पूजन केले स्तवन केले आणि त्यामुळेच महर्षी व्यासांनी निर्विघ्नपणे सर्व पुराणांची रचना केली. व्यासांना ब्रह्मदेवानेच गणेशपुराण सांगितले पण साक्षात आत्मा असे म्हणजे तू प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहे असे अथर्वशीर्ष सांगितले आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंविद्या आत्मरुपा असे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगितले जो विश्वाला व्यापून आपल्या शरीरामध्ये आत्मरूपाने वास करतो तो गणपती देवा तु गणेश असे म्हटले आहे. आत्म स्वरूपाचे ज्ञान होणे म्हणजे गणपतीचे ज्ञान होणे. श्री गणपती हे परब्रह्म आहे विश्वाची उत्पत्ती गणपतीपासूनच झाली सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी वटपत्रावर शयन करणारे बालक म्हणजेच गणपती. गणपतीचे ओम हे मुख्य रूप आहे असा गणेश पुरानात उल्लेख आहे. ओंकार हा एकाक्षरी ब्रम्हवाचक शब्द ध्वनी आहे आणि गणपतीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन देणारा आहे. या अक्षरात अशी अक्षरे आहेत हेच शब्दरूप गणेशाचे स्वरूप आहे. संत ज्ञानेश्वरांनी गणपतीचे रूप वर्णन केले आहे उपरी ईशोपनिषदे जिथे उदारी ज्ञान मकरंदे, जिथे कुसुमे मुक्ती सुगंधे, सोबती भारी आकारचरणयुक्त आकार, चरण युगल उकार, उदर विशाल मकर, महामंडल मस्त का रे हे तिन्ही एकवटले तिथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपे नमिले. आधी बीज ऋषीमुनींनी, साधुसंतांनी, ऋषींनी ,गणपतीची अनेक स्तोत्रेस्तवणे आणि कवने रचली गणपती म्हणजे वेदांचा ईश्वर मंगलमूर्ती गणपतीने विविध प्रसंगी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक सगुन रुपे घेऊन विकृत युगामध्ये विनायक अवतार घेतला. त्रेता युगामध्ये मयुरेश्वर अवतार घेतला .द्वापार युगामध्ये गजानन अवतार घेतला आणि कलियुगामध्ये धूम्र केतू अवतार घेतला प्रत्येक अवतारामध्ये गणेशाचे रूप भिन्न आहे. घराघरात आयुर्वेद ,आरोग्य सुख, समृद्धी ,ऐश्वर्य यांची अभिवृष्टी होऊन अभिवृद्धी होऊन चिरकाल आनंद नांदावा इष्ट फळांची प्राप्ती व्हावी म्हणून गणपतीची भक्ती भावाने पूजा केली जाते. सुखकर्ता आणि दुखहर्ता गणेशाचे आपण स्वागत करूया आणि दहा दिवस अतिशय पवित्र भावनेने भक्तीने त्यांची पूजा करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जे सण आहेत ते उत्सव आहेत. ते आपल्याला माणूस बनवण्याचा संदेश देतात बंधुभावाचा संदेश देतात कृतज्ञतेचा संदेश देतात या सर्वांपासून आपण शिकले पाहिजे हीच या श्री गणपतीच्या चरणी प्रार्थना-वसंतराव देशमुख जालना

Previous articleगणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धीविनायकी-वसंतराव देशमुख
Next articleरेणापूर येथे पुरात वाहून गेलेल्या तरुणांना आर्थिक मदत. ईजी. दामिनीताई दादाराव पाटील ढगे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here