Home जालना अरीबा शेख राज्यात दुसरी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.

अरीबा शेख राज्यात दुसरी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.

35
0

आशाताई बच्छाव

1000691194.jpg

अरीबा शेख राज्यात दुसरी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 28/08/2024
जालना येथील शंभर शिक्षक क्लबच्या वतीने उन्हाळी सुट्टी शालेय विद्यार्थ्यांना नातेसंबंधी ची ओळख व्हावी आणि नातेसंबंधावर स्वतःचे मत व्यक्त करता यावे यासाठी पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय ऑनलाईन ओळख नातेसंबंधांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती यात सेठ एकनाथ भगवानदास काबरा उर्दू विद्यालय टेंभुर्णी ची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अरीबा सबेरोद्दीन शेख हिने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला होता.तिच्या या यशाबद्दल यशवंत राव चव्हाण सभागृह जिल्हा परीषद येथे भव्य बक्षिस वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले . सन्मान श्री महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव नंदलाल कबरा, कोष्याध्यक्ष प्रेमसूख काबरा संचालक प्राध्यापक दत्तात्रेय देशमुख, धमाजी भागवत मुख्याध्यापिका सुमैय्या शेख मुख्याध्यापक सुरूसे प्राथमिकचे मुख्याध्यापक ज्ञानेश चव्हाण मुख्याध्यापक शेख गया तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here