Home उतर महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष त्रिभुवन यांचे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष त्रिभुवन यांचे लोटांगण आंदोलन

33
0

आशाताई बच्छाव

1000686082.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष त्रिभुवन यांचे लोटांगण आंदोलन
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)येथील नगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवर पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे लोटांगण आंदोलन करण्यात त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदन म्हंटले आहे की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा
श्रीरामपूर येथे नगरपालिके हद्दीत गेली पन्नास वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा नगरपालिकेने बसवलेला आहे अर्धाकृती पुतळा काढून त्याच जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे तसा ठराव श्रीरामपूर नगरपालिकेने केलेला आहे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार असून त्याची सर्व रक्कम देखील श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेली आहे तसेच पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते व सर्व शासकीय कार्यालय यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासंदर्भात ना हरकत दाखले दिलेले असताना जिल्हाधिकारी यांनी कळविले की ती जागा वन विभागाची आहे त्यासंदर्भात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी पुराभिलेख फोर्ट मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातील सत्तर वर्षाचे इंग्रजांच्या काळापासून नोटिफिकेशन आहे पुतळ्याच्या जाग्या संदर्भातील तीन नोटिफिकेशन त्रिभुवन यांनी पाच दिवस थांबून हस्तगत केले त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागा वन विभागाची असली तरी पण तिचं निर्वणीकरण झाले असल्याचं पुरावे समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्याचबरोबर मोर्चा रस्ता रोको आंदोलन निदर्शने उपोषण असे अनेक प्रकारचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने गेली पाच वर्षांमध्ये अनेक आंदोलन करण्यात आलेले आहे तसेच पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता या सगळ्यांना देखील निवेदना दिलेले आहे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी देखील परवानगी संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे एवढं सगळं असताना तरीपण जिल्हाधिकारी हे हेतू पुरस्कर डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने लोटांगण आंदोलन करणार आले तरीपण जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे त्यावेळी अमित काळे संदीप धीवर संतोष शेळके निखिल सूर्यवंशी आदी उपस्थित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here