Home जालना लालवाडी तालुका अंबड येथील स्मशानभूमीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा...

लालवाडी तालुका अंबड येथील स्मशानभूमीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न

20
0

आशाताई बच्छाव

1000683449.jpg

लालवाडी तालुका अंबड येथील स्मशानभूमीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न
प्रतिनिधी :
आज दिनांक 26 ऑगस्ट सोमवार रोजी मौजे लालवाडी तालुका अंबड येथील स्मशानभूमीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला . स्वातंत्र्याची 78 वर्षे होऊन सुद्धा लालवाडी गावामध्ये अद्याप हिंदू व बौद्ध समाजाची स्मशानभूमी नाही यामुळे गावकऱ्यांना मोठ्या त्रासाला सहन करावा लागत आहे अशी भावना गावकऱ्यांनी व आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावळा हरी शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, सुदाम इंगोले, जगन्नाथ ठाकूर ,सुनील पंडित, सिद्धेश्वर वरगणे , पंढरी मस्के, लखन शिंदे, लखन शिंदे ,करण चव्हाण ,भाऊसाहेब शिंदे ,कारभारी पवार ,कृष्णा शिंदे, अफरोज शहा तुकाराम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. छायाचित्र किरण खानापुरे

Previous articleशिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती
Next articleबेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here