Home जालना शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती

शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती

30
0

आशाताई बच्छाव

1000683447.jpg

शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. संजय लाखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले होते. त्यावेळी त्यांना पक्षात कुठलेही पद देण्यात आलेले नव्हते. परंतु काही संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा व राजकीय अनुभवाचा फायदा व्हावा व त्यांना पक्ष संघटनेत सर्वार्थाने सक्रीय करण्यासाठी सचिवपद देण्यात आल्याचे समजते. विद्यार्थी दशेपासून काँग्रेसमध्ये विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये विविध पदांवर व जबाबदाऱ्यांवर त्यांनी देशभर संघटनेत काम केले असून दहा – पंधरा वर्षांपासून पक्ष प्रवक्ते म्हणूनही अतिशय जबाबदारीने काम केले आहे. डॉ. लाखे पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून, मराठा आरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, दुष्काळ निवारण, सिंचन हे विषय त्यांचे अभ्यासक्षेत्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वैविध्यपूर्ण अभ्यासाचा शिवसेनेसह महाविकास आघाडीला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. या दृष्टीकोनातून या नियुक्तीकडे बघितले जात आहे. शिवसेनेत सचिव या अतिशय महत्त्वाच्या पदावर निवडले गेलेले ते ग्रामीण भागातील व मराठवाड्यातील पहिलेच पदाधिकारी आहेत. ग्रामीण भागात शिवसेना अधिक दृढ करण्यासाठी डॉ. लाखे पाटील साह्यभूत ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here