Home जालना आपल्यावर होणारा अन्याय-त्रास तुम्ही अजिबात सहन करू नका- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

आपल्यावर होणारा अन्याय-त्रास तुम्ही अजिबात सहन करू नका- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

19
0

आशाताई बच्छाव

1000683432.jpg

आपल्यावर होणारा अन्याय-त्रास तुम्ही अजिबात सहन करू नका- जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर
शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत भयमुक्त विद्यार्थिनी उपक्रम
संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्या पुढाकाराने उपक्रमाचे आयोजन
जालना, दि. २६(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- शहरातील संभाजीनगर प्रभागात असलेल्या
शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या पुढाकाराने भयमुक्त विद्यार्थिनी
या उपक्रमाचे आयोजन देशात व राज्यात सद्यस्थितीत घडणार्‍या घटनांच्या
पार्श्वभूमीवर सोमवार रोजी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजीसभापती देवनाथ जाधव, शहरप्रमुख बाला परदेशी,
घनश्याम खाकिवाले, दुर्गेश काठोटीवाले, सोनाजी पाटील यांची उपस्थिती
होती. या उपक्रमांतर्गत जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस
निरीक्षक संदीप भारती यांनी शाळेत येऊन विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने
संवाद साधला. यावेळी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना भारती म्हणाले
की, कोणत्याही परिस्थितीत मुलींनी घाबरून जाऊ नये. गुंडप्रवृत्तीच्या व
त्रास देणार्‍या लोकांचा प्रतिकार केला पाहिजे. तसेच आपणास दिलेल्या टोल
प्रâी नंबरवर संपर्क केल्यास ताबडतोब तुम्हाला मदत मिळेल. समाजातील सर्वच
घटक हे वाईट नाही तर अनेक नागरिक चांगले असतात अनेक प्रसंगी ते आपणास मदत
करतात. विद्यार्थिनींना अत्यंत मनमोकळेपणे बोलण्यास भाग पाडून त्यांनी
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना दिली व
त्यांच्या मनात पोलीस विभागाविषयी विश्वास निर्माण केला.
उपक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष भास्कर आंबेकर म्हणाले की, शहरातील
अनेक मुलींचा शाळा महाविद्यालये सुटल्यावर उपद्रवी व गुंड प्रवृत्तीच्या
लोकांकडून छेडछाड व पाठलाग करतात.

Previous articleचमनचा राजा गणेश मंडळातर्फे गोरे, पांगारकर यांचा सत्कार!
Next articleशिवसेना सचिवपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here