Home जालना चमनचा राजा गणेश मंडळातर्फे गोरे, पांगारकर यांचा सत्कार!

चमनचा राजा गणेश मंडळातर्फे गोरे, पांगारकर यांचा सत्कार!

22
0

आशाताई बच्छाव

1000683421.jpg

चमनचा राजा गणेश मंडळातर्फे गोरे, पांगारकर यांचा सत्कार!
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): येथील सुप्रसिध्द चमनचा राजा गणेश मंडळातर्फे गणेश फेस्टीवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे आणि गणेश महासंगाचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फेस्टीवलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, दिनेश फलके, राजेंद्र राख, किरण गरड, अशोक उबाळे, शरद देशमुख, प्रा. राजेंद्र भोसले, फेस्टीलचे माजी अध्यक्ष साईनाथ पवार, गणेश फेस्टीवलचे माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे, जगन्नाथ काकडे पाटील, योगेश गरड, चंद्रशेखर वाळिंबे, सगिर अहेमद माऊली कदम, सतीश देशमुख, अशोक पडूळ, योगेश पाटील, संजय देशमुख, संजय देठे आनंद कुंडलिकर, अशोक आगलावे, शक्ती राजपूत, मंगेश देशमुख, प्रवीण शर्मा, सोनु नन्नवरे आदींसह गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलतांना श्री. राजेंद्र गोरे म्हणाले की, तो इतिहास आठवला की आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. गणेश महासंघाचे पदाधिकारी आम्हाला काहीही भाव देत नाहीत, आम्हाला विचारात नाहीत, असे वाटायचे परंतू नंतरच्या काळात डॉ. संजय पाटील यांनी मनावर घेतले आणि जालना गणेश फेस्टीवल अस्तित्वात आला. त्यानंतरच्या कार्यकाळातही या फेस्टीवल मध्ये बरेच चढ उतार पाहायला मिळाले. नंतर या फेस्टीवलमध्ये काळानुरुप बरेच बदल झाले. परंतू ते सर्वाअर्थाने योग्य होते, असे सांगून श्री. गोरे यांनी चमनचा राजा आणि गणेश महासंघाबद्दलही आपल्या भाषणातून माहिती दिली.यावेळी अशोक पांगारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous articleप्रकाश पोहरे यांची ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड.
Next articleआपल्यावर होणारा अन्याय-त्रास तुम्ही अजिबात सहन करू नका- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here