Home रायगड गनिमी कावा करत शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

गनिमी कावा करत शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

32
0

आशाताई बच्छाव

1000682426.jpg

गनिमी कावा करत शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

मतांचा मलिदा मिळवण्यासाठी कोकणवाशियांची दिशाभूल : शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

तब्बल 16 वर्ष कोकणवासीयांना व चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यातून प्रवास करायला लावणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी सोमवारी पेण तालुक्यातील वाशी नाका येथे मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करण्याकरिता आलेल्या मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.

मुंबई गोवा महामार्गावर असलेले पेण तरणखोप येथील गिरोबा हॉटेल येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध प्रदर्शनाकरिता जमले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे गनिमी काव्याची आखणी करून शिवसैनिकांची दुसरी टीम तयार केली व गनिमी कावा करीत वाशी नाक्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणा देत निषेध नोंदविला. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याने शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे मागील सोळा वर्षात अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा या महामार्गाची मॅरेथॉन पाहणी केली होती परंतु हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा या महामार्गाची अवस्था बिकट असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी यावेळी दिली.

केवळ मतांचा मलिदा मिळवण्याकरिता कोकणवाशियांची दिशाभूल करण्याकरिता मुख्यमंत्र्यांचा हा पहाणी दौरा असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केला.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवासेनेचे आमिर ठाकूर, कैलास गजने, प्रकाश पाटील, धनंजय गुरव, दर्शना जवके, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, छाया काईनकर, काँग्रेसचे चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, पाली तालुका प्रमुख दिनेश चिले, पाली शहर प्रमुख विद्येष आचार्य, राजाराम पाटील, नंदु मोकल, लवेद्र मोकल, गजानन मोकल, चंद्रहास म्हात्रे, शिवाजी म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Previous articleशिर्डी येथे मोफत कुत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिर
Next articleप्रकाश पोहरे यांची ईलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अविरोध निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here