Home उतर महाराष्ट्र रिपब्लिकन युवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी इम्रान पटेल

रिपब्लिकन युवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी इम्रान पटेल

18
0

आशाताई बच्छाव

1000682387.jpg

रिपब्लिकन युवा सेनेच्या उत्तर
महाराष्ट्र अध्यक्षपदी इम्रान पटेल

श्रीरामपूर / प्रतिनिधी दिपक कदम:
श्रीरामपूर शहरातील उच्चशिक्षित आणी धडाडीचे युवा कार्यकर्ते इम्रान मुसा पटेल यांची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
श्री.पटेल त्यांची पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय जाण व जनसंपर्क ही जमेची बाजू लक्ष्यात घेऊन सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये रिपब्लिकन सेने चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या स्वाक्षरी ने सदर नियुक्ती पत्र त्यांना प्रदान करण्यात आले. सदर नियुक्तीसाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य शशिकांत कांबळे यांनी शिफारस केली. सदर नियुक्ती पत्र पुणे येथे आयोजित जाहीर प्रवेश व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात इम्रान पटेल यांना देण्यात आले.
उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष पद स्वीकारतांना इम्रान पटेल यांनी वरिष्ठांचे आभार मानत भविष्यात रिपब्लिकन सेनेसाठी भरीव काम करून सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्याची हमी दिली.
त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, पत्रकारिता साहित्य आदि क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleश्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाईला न दिल्यास प्रत्येक मतदारसंघात आमची ताकद दाखवून देऊ विजयराव वाघचौरे         
Next articleतेली समाजाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी राहावे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here