Home भंडारा माय बापाचे महत्व मुला-मुलींनी ओळखले पाहिजे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात स्वतःला फसवू नका-...

माय बापाचे महत्व मुला-मुलींनी ओळखले पाहिजे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात स्वतःला फसवू नका- वसंत हुंकारे

164
0

आशाताई बच्छाव

1000682342.jpg

माय बापाचे महत्व मुला-मुलींनी ओळखले पाहिजे

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात स्वतःला फसवू नका- वसंत हुंकारे

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 ला दुपारी 12 वाजता गणेश सभागृह अड्याळ येथे प्रबोधनकार वसंत हुंकारे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम ,ठाणेदार धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रबोधनकार वसंत हुंकारे यांनी आपल्या प्रबोधनातून सर्वसामान्य परिस्थितीत जीवन जगत असताना आई-वडिलांनी मुला मुलींना जन्म दिल्यापासून , लहानपणापासून तर त्यांच्या शाळा ,कॉलेजच्या शिक्षणापासून, लग्नापर्यंत आई-वडिलांना काय त्रास होतो ते आपण समजून घेतले पाहिजे .घरची अत्यंत वाईट परिस्थिती असताना काबाडकष्ट करून आपले मायबाप एक वेळचे उपाशी राहून कोणालाही न सांगता आपल्या मुलामुलींकरिता घाम गाळत असतात . आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचीआपण जाणीव ठेवली पाहिजे .शाळा कॉलेज मध्ये शिकत असताना आपल्या जीवनात अनेक वाईट प्रसंग येत असतात व त्यांचे परिणाम आपल्या 18 ते 20 वर्षाच्या वयातच होत असतात. आपल्याला प्रेमाचे नाटक करून फसविले जाते व त्याचे परिणाम आई-वडिलांना त्याचप्रमाणे पोलीस विभागाला त्याचा त्रास सहन करावा लागतो म्हणून मुला मुलींनी आपल्या आई-वडिलांना कोणताही त्रास न देता कोणतेही गालबोट न लागता आपण आपल्या आई-वडिलांच्या विचारानेच आपले भविष्य घडविले पाहिजे व आपल्या आई-वडिलांवर कोणतेही गालबोट भविष्यात लागणार नाही असे कृत्ये मुला मुलींनी करू नये व आपले भविष्य घडवावे असे प्रबोधनकार वसंत हुंकारे यांनी गणेश सभागृह येथे मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, थानेदार धनंजय पाटील ,शाळा कॉलेज विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षक गण, पालक गण नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here