Home उतर महाराष्ट्र आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक शाळेत दहिहंडी कार्यक्रम संपन्न

आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक शाळेत दहिहंडी कार्यक्रम संपन्न

267
0

आशाताई बच्छाव

1000682329.jpg

आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक शाळेत दहिहंडी कार्यक्रम संपन्न.सोनई,(कारभारी गव्हाणे): आज सोमवार दि. 26/08/2024 रोजी आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक या शाळेत श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे या दहिहंडी कार्यक्रम प्रसंगी राधाकृष्ण वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले लहान गटातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे नृत्य सादर केले आहे वेशभूषा या कार्यक्रमांतर्गत शाळेतील प्रत्येक इयत्तेतील 19 जोड्यानी भाग घेतला त्यात लहान गटातील 7 जोडीतून प्रथम क्रमांक कु. खेडे वेदांती व चि. लोहकरे श्लोक यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक कू. देशमाने रिद्विका व ठुबे श्रेयांश 1ली व 2 री गटातील प्रथम क्रमांक चि. राऊत आरव व कु. बोरुडे प्रणिता तसेच द्वितीय क्रमांक कु. चंदेल अक्षरा व चि. ताठे शिवम तसेच मोठा गटातील प्रथम क्रमांक हा विभागून देण्यात आला त्यात कु. लोणारी तनुजा व चि. निमसे ऋत्विक तर कु. काशीद धनश्री व चि. जाधव अवधूत तर दीतीय क्रमांक चि. वैरागर कार्तिक व कु. पालवे वैशाली यांना देण्यात आला आहे वरील सर्व स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ गायत्री बडाख ऍड मनिषा गडाख ह्या परीक्षक म्हणून काम पाहिले तर प्रमुख उपस्थिती ह भ प निवृत्ती महाराज लांडे मुख्याध्यापक श्री दरंदले सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री खेसमांळसकर सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. सर्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा सौ जयश्रीताई गडाख व संस्था सचिव श्री रविराज पा गडाख यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here