आशाताई बच्छाव
आश्रमात अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलींवर आश्रम चालक दादा महाराजांचा अत्याचार.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
महाराष्ट्र मध्ये झालं तरी नक्की काय.. दररोज नवनवीन अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. बदलापूरच्या चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच अशातच राज्यामध्ये अत्याचाराच्या नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. असा प्रकार संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडला आहे. आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या दोन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, दादासाहेब पुंडलिक अकोलकर (वय ६७) ऊर्फ दादा महाराज या आरोपीविरुद्ध
कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालविण्यात येतो. या आश्रमातील मुली जवळच्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात येतात.
पीडितांच्या फिर्यादीवरून दादा महाराजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.