Home छ. संभाजीनगर संतापजनक: सुसंस्कृत महाराष्ट्राला वासनांधानी पछाडले… शिक्षण क्षेत्रानंतर आता धार्मिक शिक्षण देणाऱ्या महाराजाने...

संतापजनक: सुसंस्कृत महाराष्ट्राला वासनांधानी पछाडले… शिक्षण क्षेत्रानंतर आता धार्मिक शिक्षण देणाऱ्या महाराजाने केले मुलीवर लैंगिक अत्याचार!

71
0

Yuva maratha news

1000677276.jpg

संतापजनक: सुसंस्कृत महाराष्ट्राला वासनांधानी पछाडले…
शिक्षण क्षेत्रानंतर आता धार्मिक शिक्षण देणाऱ्या महाराजाने केले मुलीवर लैंगिक अत्याचार!
(राजेंद्र पाटील राऊत)
संभाजीनगर:- जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या हतनूर शिवारातल्या जैतापूर रस्त्यांवरील कन्या आश्रमात तेथील महाराजाने दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना (दि.२० आँगस्ट) रोजी घडली. दादासाहेब पुंडलिक अकोलकर वय ६८ असे आरोपी महाराजाचे नाव आहे.अकोलकर हा महाराज हा मागील नऊ ते दहा वर्षांपासून हतनूर शिवारात असलेल्या जैतापूर रस्त्यांवरील गट नंबर १३१ मध्ये माऊली वारकरी शिक्षण कन्या आश्रम चालवतो.या आश्रमात आठ ते अठरा वर्षं वयाच्या सुमारे पंधरा ते वीस मुली धार्मिक शिक्षण घेत आहेत.या मुली दिवसा शाळेत शिक्षण घेतात व रात्री आश्रमात वास्तव्यास असतात.सकाळी व सायंकाळी अकोलकर महाराज या मुलींना धार्मिक शिक्षण देत होता.मंगळवारी २० आँगस्ट रोजी अकोलकर महाराजाने रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याच्या खोलीत बोलावून अत्याचार केला.त्याच रात्री त्याने एका दुसऱ्या मुलीवरही अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.हा प्रकार कुणाला सांगितला तर तुम्हाला काहीच शिकविणार नाही अशी धमकी या महाराजाने पीडीत मुलीना दिली.या मुलीकडे कुठलीही संपर्काची साधने किंवा मोबाईल नसल्यामुळे त्यांनी शुक्रवारी शाळेत गेल्यावर शिक्षकांच्या मोबाईलवरुन हा प्रकार पालकांना कळवला.त्यानंतर पीडित मुली व त्यांच्या पालकांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली.त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवाड , सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक कादिर पटेल ,आदींनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी महाराज दादासाहेब अकोलकर यास ताब्यात घेऊन त्याच्यावर कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनला पोस्को भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,महाराजला अटक करण्यात आली आहे.

Previous articleप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दीदींशी संवाद_
Next articleकर्ज परतफेडीसाठी संपूर्ण कारखान्यांच्या संचालक मंडळावर जबाबदारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here