Home जालना बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन

19
0

आशाताई बच्छाव

1000675380.jpg

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
—————————————
नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी @ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ———–—————————–जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी करत जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आज शनिवारी शहरातील गांधी चमन येथे तोंडाला काळी फित लावून धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बंद मागे घेऊन मुक निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंटयाल, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी बाबू पवार, माजी गटनेते गणेश राऊत बाबूराव सतकर, राम सावंत, शहर जिल्हाप्रमुख बाला परदेशी, युवा नेते अक्षय गोरंटयाल, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, वसंत जाधव, गंगुबाई वानखेडे, मनकर्णाताई डांगे, मंगल मिटकर, शितलताई तनपुरे, दिनकर घेवंदे, शेख इब्राहिम, वैभव उगले, राजेंद्र जाधव, रमेश गौरक्षक, विनोद रत्नपारखे, जगदीश भरतीया, राधाकिसन दाभाडे, शेख शकील, आदी उपस्थित होते.

Previous articleमाहेर’ च्या रक्षाबंधनामुळे बहिणींच्या चेहर्‍यावर हास्य फुलले
Next article१५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here