Home जळगाव सहा तासांपासून चाळीसगाव बसस्थानकावर अडकलेल्या विद्यार्थिनींना आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी सौ.प्रतिभाताई...

सहा तासांपासून चाळीसगाव बसस्थानकावर अडकलेल्या विद्यार्थिनींना आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी दिला आधार…

74
0

आशाताई बच्छाव

1000675356.jpg

सहा तासांपासून चाळीसगाव बसस्थानकावर अडकलेल्या विद्यार्थिनींना आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी दिला आधार…

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे खाजगी वाहनांनी विद्यार्थ्यांना चहा फराळाची व्यवस्था करत सुखरूप पोहोचवले आपापल्या घरी…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- आज अचानकपणे झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सकाळपासून आलेल्या चाळीसगाव येथे शाळा कॉलेज साठी आलेल्या बऱ्याच विद्यार्थी – विद्यार्थिनी या दुपारी ३ वाजेपर्यंत चाळीसगाव बस स्थानकावर उपाशी अडकून पडल्या होत्या,
याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या फाउंडेशनच्या सदस्यांसोबत चाळीसगाव बस स्थानक गाठत बस स्थानकावर उपस्थित महिला वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनींची विचारपूस केली.
यावेळी एका विद्यार्थिनीने प्रतिभाताई समोर रडून “ताई, सकाळपासून अन्नाचा कण देखील नाही, पाऊस सुरू आहे कुटुंबाशी संपर्क होऊ शकत नाही, दुसरा पर्यायी मार्ग नाही यामुळे आम्ही काय करावे सुचत नव्हते, केव्हा घरी जाऊ असं झालं आहे” असं सांगितले.
यावेळी प्रतिभाताई चव्हाण यांनी त्या विद्यार्थिनीला सावरत “घाबरू नको दीदी तुमची बहीण तुमच्या सोबत आहे, काळजी करू नको” असा संवाद साधत त्यांना धीर दिला व तात्काळ चिवडा फरसाण पॅकेट्स आणत तेथे अडकलेल्या विद्यार्थिनींना वाटप केली.
*तसेच चाळीसगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख मयूर पाटील यांची भेट घेऊन त्यांना जादा बसेसची व्यवस्था करण्याची विनंती केली तसेच ज्या गावाला बस सोडण्यास काही अडचण असेल त्या गावांना शिवनेरी फाउंडेशन च्या माध्यमातून खाजगी वाहनाने सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात सोडण्यात येईल याबाबत नियोजन करण्याचे सांगितले
रहीपुरी वडगाव लांबे येथील विद्यार्थ्यांना प्रतिभाताई यांनी चहा बिस्किटे व फरसाण देवून खाजगी वाहनांनी गावी सोडण्यात आले.

Previous article28 तासानंतर नार पार जलसमाधी आंदोलन स्थगित
Next articleविद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करा – रयत सेनेची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here