Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा .

सोनई महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा .

39
0

आशाताई बच्छाव

1000674648.jpg

सोनई महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा .     नेवासा,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी )       मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानेआज शुक्रवार दि.२३/०८/२०२४ रोजी सकाळी १०:४० वा ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे भौतिक शास्त्र विभागप्रमुख प्रा .पांडुरंग देशमुख हे होते. त्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमेबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य लावरे सर यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये अंतराळ दिन का साजरा करावा ? याबद्दल सखोल मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ.बाळासाहेब खेडकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. हरिश्चंद्र सडेकर यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. राहुल निपुंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भारती सुद्रिक यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here