Home जालना भारतीय जनता पार्टी, जालनाकडून बांग्लादेश व बदलापूर येथील घटनेचा निषेध

भारतीय जनता पार्टी, जालनाकडून बांग्लादेश व बदलापूर येथील घटनेचा निषेध

23
0

आशाताई बच्छाव

1000671937.jpg

 

 

भारतीय जनता पार्टी, जालनाकडून बांग्लादेश व बदलापूर येथील घटनेचा निषेध

जालना प्रतिनिधी दिलीप बोंडे: भारतीय जनता पार्टी च्या वतीने बांगलादेश येथील हिंदू समजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व बदलापूर येथील चिमुरड्या मुलीवर झालेल्या घटनेच्या निषेदार्थ संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाही करण्यासाठी भाजप जालनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी जालना यांना निवेदन करुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हणाले आहे की “बांगलादेश मधील बदलत्या राजकीय परिस्थिती मुळे तेथील हिंदू समाजावर अन्वनित अत्याचार होत आहेत, आत्तापर्यंत किमान ६०० पेक्षा जास्त हिंदूंची हत्या झाली आहे, अनेक हिंदू मठ-मंदिरे यांची तोडफोड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पातळीवर योग्य तो न्याय तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजास मिळावा त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी हि विनंती.

पश्चिम बंगाल मधील आर जी कर हॉस्पिटलमधील एका महिला रेसिडंट डॉक्टर वर रात्रीपाळीच्या वेळी अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली व तेथील सरकारने हि आत्महत्या आहे असे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न्य केले, अनेक दिवस उलटून सुद्धा योग्य तो तपास केला नाही. माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना असून पीडितेला व तिच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा व या व अश्या प्रकारच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात तरतूद करावी अशी विनंती आम्ही या निवेदनातून करीत आहोत.

बदलापूर येथील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारातीळ दोषी व्यक्तीस देखील या जघन्य अपराधासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करीत आहोत व अश्या प्रकारच्या अपराध महाराष्ट्रात पुढील काळात घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Previous articleनेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद
Next articleनागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here