Home जालना माहोरा परिसरात जोरदार पाऊस पडल्याने पिकांना मिळालं जीवदान

माहोरा परिसरात जोरदार पाऊस पडल्याने पिकांना मिळालं जीवदान

22
0

आशाताई बच्छाव

1000670814.jpg

माहोरा परिसरात जोरदार पाऊस पडल्याने पिकांना मिळालं जीवदान
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 23/08/2024
सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांपासून अधुनमधून रिमझिम हलका पाऊस पडायचा मात्र गुरुवारी रात्री दहा वाजता पावसाला सुरुवात झाली एकंदरीत पाऊस अर्धा तास चालू होता. पाऊसचा जोर साधारण होता. परंतु सुमारे अर्धा तास पडल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.अजूनही मोठ्या पुर पावसाची प्रतीक्षा असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अजून तरी दमदार पाऊस झाला नसल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. चांगला पाऊस झाला तरच रब्बी पिके येतील आणि भविष्यातील पिण्याचा पाणी प्रश्न सुटेल असे शेतकरी सांगत आहेत. कारण अर्धा पावसाळा संपलेला आहे.शेतकऱ्यांच जिवन पावसावरच अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here