आशाताई बच्छाव
मुरादपुर येथील वृक्षारोपण फक्त कागदावरच वृक्ष लागवडिच्या प्रतीक्षेत मौजे मुरादपुर ग्रा प चा डिसाळ कारभार पुन्हा ऐकदा चव्हाट्यावर….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :– बुलढाणा जुन जुलै महिन्यात लागवडीसाठी आणलेले वृक्ष फक्त कागदोपत्री च लावले आहे तर आतापर्यंत वृक्षारोपण फक्त शासणाचे पैसे काढण्यासाठी च होता कारण लावलेले वृक्ष गेले कुठे असा प्रश्न गावकर्याना पडला आहे त्यातच वृक्ष लागवड करण्याऐवजी अवैध वृक्षतोड करुन अतिक्रमण धारक यांना सदर जमिन बळकावण्यासाठी सहकार्य करायचे तसेच गावातील घाणिचे साम्राज्य याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे तरी अशा निष्क्रीय कर्मचारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व लागवडिसाठि आणलेले वृक्ष त्वरित लागवड करावी
व लागवडीसाठी उशीर करणार्यावर कारवाई व्हावी व अवैध वृक्षतोड करुण ग्रां प सहकार्य केले अशा कर्मचारी पदाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी विष्णु महाराज गाडेकर उपसरपंच मुरादपुर यांनी केली आहे